राज्यसभा निवडणूकीप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला विधान परिषदेत देखील मोठा दणका बसला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचीही मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला धक्का बसण्याच मूळ कारण म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी.
शिवसेनेला शिंदे यांची नाराजी भोवली असल्याच बोललं जातं आहे. गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेत शिंदे सहभागी नसल्याचे सांगितले जात होतं. याचाच फटका शिवसेनेला बसला असल्याच आता बोललं जातं आहे. तर आता शिंदे नाराज असल्याने शिवसेनेच्या मतांवर त्याचा काही परिणाम झाला का? यावर सध्या चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या निवडणुकीत स्वत:ची शिवसेनेकडे ५५ मते होती. यापैकी शिवसेनेच्या दोन उमेदवारांना पहिल्या पंसतीची ५२ मते मिळाली. याचाच अर्थ ५५ पैकी शिवसेनेची तीन मते फुटली. तर दुसरीकडे, सेनेसोबत असलेल्या पाच अपक्ष आणि इतर तीन मतांचा जर आपण विचार केला तर सेनेसोबत असलेली एकुण ११ मते फुटल्याचे या निवडणुकीत स्पष्ट होत आहे.
यामुळे कुठतरी शिंदेंच्या नाराजीचा फायदा घेत भाजपला मत फोडण्यात यश आलं असल्याच आता बोललं जातं आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचे 113 आमदारांचे संख्याबळ असताना 133 मते मिळवून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मते आपल्याकडे वळवन्यात पुन्हा एकदा भाजपला यश मिळाले आहे.
या निमित्ताने पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीत फडणवीसांचा करिश्मा पाहायला मिळाला. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताच महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या हलचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठीक बोलावली आहे.
मात्र असे असतानाच एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप शिवसेनेला यश मिळालं नाहीये. तर आता शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
बहुजन विकास आघाडीची मतं कोणाला मिळाली? हितेंद्र ठाकूर यांनी केलं स्पष्ट
भाजपचे उमेदवार जिंकण्यामागं होतं ‘हे’ कारण, अतुल भातखळकरांनी सांगितलं गणित
प्रमाणापेक्षा छोटी मोमोकिनी घालून अनुष्का सायकलवर करत होती ‘हे’ चाळे, विराटने काढला व्हिडीओ
आमच्या जागी तुमचा मुलगा असता तर? आंदोलकांनी प्रश्न विचारताच अधिकारी म्हणाला…