Share

माझ्या मनात आजही मोदींबद्दल प्रेम, मी त्यांचा आदर करतो; उद्धव ठाकरेंचे मोदीप्रेम अचानक का उफाळले?

narendra modi
राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत जावून शिवसेना सत्तेत आली आहे. मात्र राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिवसेना आणि भाजप एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधक सत्ताधारी नेत्यांना घेरण्याची एकही संधी सोडत नाहीये.

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. त्यामुळे शिवसेना आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष अधिक वाढलेला पाहायला मिळत आहे. मात्र अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक सूचक व्यक्तव्य करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला मुखालत देताना मुख्यमंत्र्यांनी मोदींसोबतच्या संबंधावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, ‘मोदींशी काय होतं आमचं नातं? आजही जाहीर सांगतो, मोदींचं नाव घेताना मी त्यांना नरेंद्र भाई म्हणतो. माझ्या मनात आजही त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहेच. व्यक्ती म्हणून नक्कीच आदर आहे, असं त्यांनी म्हंटले आहे.

त्यानंतर त्यांनी युती बद्दल देखील भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आमचं नातं आहे म्हणणायचं का होतं म्हणायचं हे दोन्हीकडून ठरवलं पाहिजे. माझ्याकडून आहे. याचा अर्थ युती होईल का असं नाही. मी व्यक्तिगत सांगतो. आमच्या मनात एकमेकांबद्दल कुठे तरी ओलावा आहे.’

दरम्यान, राज्यातील भाजप नेते हे सत्ताधारी नेत्यांवर सातत्याने टिका करत आहे. टिका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीये. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. असे असले तरी सध्या राज ठाकरेंच्या सभांना राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now