आगामी महानगरपालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण जुळवण्यास सुरूवात झाली आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून देखील मोर्चेबांधणीस सुरूवात झाली आहे. महानगरपालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना – भाजप आमनेसामने येणार आहे.
आतापासूनच आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकात खैरे (Chandrakant Khaire) यांनी याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. खैरे यांनी भाजपचे नेते भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लक्ष केलं आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. ‘मी शिवसेनेचा वाघ असून, मी शिकार करू शकतो. अनेकांची शिकार केली आहे. मला दोन बोके दिसतायत त्यांची मी शिकार करणार,’ असा खोचक टोमणा खैरे यांनी दानवे आणि कराड यांना अप्रत्यक्षरीत्या लगावला आहे. यावर अद्याप दानवे आणि कराड यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.
राज्यसभेसाठी शिवसेनेने संभाजी राजे यांना शिवबंधन बांधण्याची अट घातली होती. मात्र त्यांनी ती मान्य न केल्याने संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र चंद्रकात खैरे यांच्या देखील नावाची चर्चा होती. परंतु, शिवसनेने संजय पवारांना संधी दिली.
याबाबत बोलताना खैरे म्हणाले, ‘पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. संजय पवार सुद्धा जुने आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजेंसमोर एक मजबूत शिवसैनिकाला संधी दिल्याने आम्हाला याचा अभिमान आहे,’ असं चंद्रकात खैरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना खैरे म्हणाले, ‘मी जरी आज खासदार नसलो तरीही लोकं मला खासदार म्हणतात त्यामुळे मी सुद्धा खुश होतो की, लोकं मला खासदार समजतात असे खैरे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी ‘पक्षश्रेष्ठीने पुढच्या लोकसभेच्या उमेदवारीच काही वचन मिळाले का? असं विचारलं मात्र यावर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या
मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..
बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवारांमध्ये कोणते पार्ट टाकलेत? मी वर गेल्यावर ब्रम्हदेवाला विचारणार
धर्मवीरने उडवली बॉलिवूडची झोप, १० दिवसांत कमवले तब्बल ‘एवढे’ कोटी; आकडा ऐकून डोळे पांढरे होतील
उमरानचा घातक चेंडू लागला मयंकच्या बरगडीत, जबर जखमी झाल्याने जागेवरच लागला रडू; पहा व्हिडीओ