Share

वंचित बहुजन आघाडी आक्रमक होताच चंद्रकांत खैरे नमले, शब्द मागे घेत दिली थेट ‘ही’ ऑफर

chandrkant kahire

शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे नेहमी आपल्या विधानांनी चर्चेत असतात. नुकतच त्यांनी वंचित आघाडीवर गंभीर आरोप केले होते. ‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं. खैरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला. ‘दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे काळं फासू,’ असा गर्भित इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला. अखेर खैरे यांनी आपले शब्द मागे घेतले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना खैरे म्हणतात, ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मी जे बोललो, जे आरोप वंचित बहुजन आघाडीवर केले होते ते मी मागे घेतले आहे. वंचितच्या नेत्यांशी मी संपर्क साधून जे बोललो ते शब्द मागे घेत असल्याचे सांगितले असल्याच खैरे यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना खैरे म्हणाले, ‘एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना फसवले, एमआयएममुळे आंबेडकरांचा दोन्ही ठिकाणी पराभव केला. त्यामुळेच वंचितने एमआयएमची साथ सोडली,’ असं खैरे यांनी सांगितलं आहे. ‘भविष्यात वंचित आघाडी आमच्यासोबत देखील येऊ शकते,’ अशी ऑफरही खैरे यांनी दिली.

वाचा काय आहे वाद..?  ‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता.

त्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद यांनी तर चंद्रकांत खैरेंना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला होता.  ‘दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे काळं फासू,’ असा गर्भित इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला होता. अखेर खैरे यांनी आपले शब्द मागे घेतले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या; गोपीचंद पडळकरांचे पवारांवर पुन्हा गंभीर आरोप
दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय
भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now