bhaskar jadhav : काही दिवसांपूर्वीच राजकीय वर्तुळात एक खळबळजनक घटना घडली. विरोधकांवर टीका सडकून टीका करणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. या घटणेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याच प्रकरणाचा धागा पकडत अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष बाब म्हणजे, राजकीय लढाईचे पडसाद आता घरापर्यंत गेले असल्याच यातून स्पष्ट होतं असल्याचं बोललं जातं आहे. यावर खुद्द भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे.
‘हल्ले करून तुम्ही मला शांत करू शकत नाही. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी बोलत राहणार. पक्ष फोडून तुमचे समाधान झाले नाही, म्हणून तुम्ही विरोधी पक्षातील बोलणारी माणसं मारून जर तुमचा पक्ष वाढणार असाल, तर निश्चितपणे मला मारा. मात्र, मी माघार घेणारा कार्यकर्ता नाही”, असेही ते म्हणाले.
घरावर हल्ला हल्ला झाल्यानंतर जाधव पहिल्यांदाच चिपळूणमध्ये आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते भावूक झालेले पाहायला मिळाले. अन् बोलता बोलता भास्कर जाधव रडायला लागले. मी घेतलेली भूमिका माझ्या सहकाऱ्यांना मान्य आहे त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं असं जाधव म्हणाले.
यावेळी माध्यमांशी बोलताना टयांनी म्हंटलं आहे की, या हल्ल्यामागे सरकारचाच हात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. शिवसेना संपवण्याचा अनेकदा भाजपने प्रयत्न केला. पण, शिवसेना संपली नाही, त्यानंतर त्यांनी आमचे 40 लोकं फोडले. शिवसैनिकांना पुन्हा साद घालण्याचा मी निर्णय घेतला आहे, असं जाधव म्हणाले.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पहिल्यासारखी गरजायला लागली, असल्याच देखील जाधव यावेळी बोलताना म्हणाले. मी घेतलेली भूमिका माझ्या सहकाऱ्यांना मान्य आहे त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं असं भास्कर जाधव म्हणाले. सध्या या प्रकरणावरून आता वातावरण तापलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…