Share

shivsena : शिवसेनेचं ‘मिशन ५०’ पूर्ण..! शिवसेनेने केला राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’; बोरनारेंना हादरा, वाचा नेमकं काय घडलं?

udhav thackeray

shivsena : अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यातच औरंगाबादमधील वैजापुर मतरदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांचा देखील समावेश आहे. राज्यात सत्तांतर होताच अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यामुळे शिवसेने अक्षरक्षा गळती लागली आहे.

मात्र असं असलं तरी देखील कुठतरी शिवसेनेला आता नव्याने उभारणी येतं असल्याच पाहायला मिळत आहे. शिंदे गटात सामील झालेले बोरनारे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धक्का दिला आहे. औरंगाबाद राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष विजयराव साळवे यांनी भगवा हाती घेतला आहे.

वैजापूर मतदारसंघातील पन्नास गावातील ग्रामपंचायत सदस्य आता शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. अंबादास दानवे हे मित्रपक्षातीलच पदाधिकाऱ्यांना गळाला लावत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यामुळे आता शिवसेने राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याचं बोललं जातं आहे.

येणाऱ्या काळात वैजापूरच्या ५० गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे शिवसेनेते प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी माजी जिल्हाअध्यक्ष विजयराव साळवे, संघर्ष सोनवणे, विक्की चावरीया व कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये औरंगाबादमध्ये राजकीय वातावरण नेमकं कसं असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागलं आहे.

कोणी – कोणी केला शिवसेनेत प्रवेश..?
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र पाटील जगदाळे, सरपंच जानेफळ, विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, कैलास सुरेश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वालफ कुहिले, जानेफळ गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष जगन पाटील जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य करजगाव तान्हाजी पाटील उगले, सरपंच पेडेफळ सोपान पाटील आहेर, सुनील पाटील मतसगर जानेफळ यांनी शिवबंधन बांधले.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now