कालची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जाहीर सभा अनेक मुद्यांनी सध्या चर्चेत आहे. अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लागलं होतं. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या बदल्या भूमिकेवर, विरोधकांवर याचबरोबर हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली.
या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर त्यावरून शिवसेना आणि भाजपा-मनसे यांच्यात सुंदोपसुंदी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच राजकीय सभा होती. म्हणून या सभेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर दुसरीकडे या सभेतील एक क्षण चांगलाच लक्षणीय ठरला आहे. या सभेला लाखो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. शिवसैनिकांसोबतच शिवसेनेचे अनेक नेते मंडळी देखील या सभेला उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. शिंदे यांचे भाषण सुरू असताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व्यासपीठावर आले. त्यानंतर शिंदे यांचे भाषण पूर्ण झाले अन् आदित्य ठाकरे भाषणासाठी उभे राहिले. आदित्य ठाकरे येताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली.
शिवसैनिकांच्या या प्रतिसादाला पाहून आदित्य ठाकरे भावूक झाले. त्यांतर आदित्य यांनी थेट व्यासपीठाच्या समोरील बाजूस जाऊन गुडघे जमिनीवर टेकवत शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. मुख्यमंत्र्यांच्या सभेतील या क्षण लक्षणीय ठरला असून चर्चेचा विषय देखील बनला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले की, तुमच्या समोर नतमस्तक होताना मला तुमच्यात पंचमुखी हनुमान दिसले, मर्यादा पुरूषोत्तम राम, सीता, लक्ष्मण, महादेव दिसले, आपल्यात मला हिंदुह्रद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे व माझ्या आजी दिसल्या. आम्ही तुमच्या आशीर्वादाने सत्तेत बसलो.’
महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले, “ठोक के जवाब मिलेगा”!
बाॅलीवूडबाबतच्या वक्तव्यावर कंगनाचा सपशेल यु टर्न; आता महेशबाबूला पाठींबा देत म्हणाली…
पठ्याने मातीपासून बनवला चक्क कुलर, ना वीजबिल ना पर्यावरणाची हानी, वाचा कसा केला हा आविष्कार
वेड्यांच्या चांगल्या इस्पितळात दाखवा तिला; केतकी चितळेवर अजितदादा भडकले