Share

Shivsena: तब्बल १२ वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या नेत्याला ठाकरेंनी हाकललं, शिंदेंनी मध्यरात्री ३ वाजता….

eknath shinde (2)

शिवसेना(Shivsena): गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ते ४० आमदार आणि १२ खासदार यांना सोबत घेऊन वेगळे झाले. काही दिवसातच भाजपसोबत त्यांनी सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार आहे. घडलेल्या अनेक घडामोडींमुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यात अनेक वाद निर्माण झाले.

त्या वादात आणखी भर पडत आहे. शिवसेना निवडणूक चिन्ह, दसरा मेळावा, फॉक्सकॉन प्रकल्प हे सर्व वाद अजूनही सुरूच आहे. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील काही नेत्यांची हकालपट्टी केली आहे. त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या नेत्यांना मोठं गिफ्ट दिल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेनेतून हकालपट्टी केलेले प्रकाश पाटील हे गेले १२ वर्ष शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यासोबतच ते ठाण्यातील अग्रगण्य असलेल्या गोपीनाथ पारसिक बँकेच्या उपाध्यक्षपदी सुद्धा कार्यरत होते. शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचीसुद्धा शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्यांच्या हकालपट्टीची घोषणा आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी काल भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. अशातच एकनाथ शिंदे यांनी प्रकाश पाटील यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली.

नियुक्ती पत्र १५ सप्टेंबरला रात्री सुपूर्द करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, प्रकाश पाटील यांच्या संघटन कौशल्याचा पक्ष संघटनेसाठी राज्यभर नक्कीच उपयोग होईल. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले दुसरे नेते वामन म्हात्रे यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी बदलापूर शहर प्रमुखपदी केली. त्यांच्या अनुभवाचा फायदा शिंदे गटाला बदलापूर परिसरात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

वामन म्हात्रे यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई करण्याचे आरोप लावून त्यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे. म्हात्रे यांच्याकडे शिवसेनेनं नगराध्यक्ष पद दिलं होत. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांनी एकदा मनसेमध्ये सुद्धा प्रवेश केला होता. परंतु, काही दिवसातच त्यांना परतावे लागले.

महत्वाच्या बातम्या
Gold ring: ‘या’ दिवशी जन्मणाऱ्या बालकांना मिळणार सोन्याची अंगठी; भाजप नेत्याची घोषणा
Mahavikas Aghadi : ..तर राज्यात महाविकास आघाडी लोकसभेच्या ३५ जागा जिंकेल, भाजपला मिळतील फक्त १३ जागा
Devendra fadnavis : ‘येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही बघाच’- देवेंद्र फडणवीस
1993 च्या या तीन सेकंदाच्या व्हिडीओने ऐश्वर्या रातोरात झाली सुपरस्टार, तुम्ही पाहिला का तो व्हिडीओ?

ताज्या बातम्या इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now