Shivsena : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. संजय राऊत त्यांच्या परखडपणे बोलण्यामुळे सतत कोणाच्या ना कोणाच्या निशाण्यावर राहतात. संजय राऊत राजघराण्यावर सातत्याने टीका करत असतात. नुकतेच संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट संजय राऊत यांच्या स्वभावावर शंका घेतली. संजय राऊत यांचा स्वभाव विकृत आहे. त्यामुळे ते राजघराण्यांवर वारंवार टीका करत आहे. ही विकृती वाढत चालली आहे. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून बोललं पाहिजे. उचलली जीभ लावली टाळायला असं करण्याची गरज नाही. असे सांग म्हणत मी संजय राऊत यांना ओळखतही नाही. त्यांना महत्त्व देत नाही, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आता तर निर्लज्जपणाची हद्द झाली. काही विषय नसेल तर प्रत्येक वेळी राजघराण्यावर टीका केली जात आहे. पण ज्या राजघराण्याविरुद्ध तुम्ही बोलत आहात. त्याच घराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे राजघराण्याविषयी बोलताना थोडी तरी लाज बाळगा, असा सल्ला भोसले यांनी दिला.
दरम्यान, नुकताच साताऱ्यामध्ये पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊत देखील उपस्थित होते. मेळाव्यात संजय राऊत आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना राऊत यांनी संभाजी छत्रपती, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि शंभुराजे देसाई यांचे नाव न घेता घनाघाती टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातले आहात. तुम्ही त्यांचे वंशज आहात. पण तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. अनाजी पंतांचे चेले झाले आहे. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत.
संजय राऊत यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. तसेच अनेक राजकीय मंडळी यावर प्रतिक्रिया देत आहे. उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत त्यांनी आपल्या हटके स्टाईलने समाचार घेतला आहे. थेट छत्रपतींच्या घराण्यावरच राऊत यांनी टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
महत्वाच्या बातम्या
ठाकरेंनीच चूक केली, ते मुख्यमंत्री झाले नसते, आदित्यला मंत्री केले नसते तर…; ठाकरे गटातील खासदाराची थेट टिका
दूधधंद्यात कमावला बक्कळ पैसा; आज आहे १०० म्हशी आणि १०० एकर जमीनीचा मालक, वाचा यशोगाथा..
आम्ही तर रामकृष्णाचे वंशज, धर्मांतरनंतरही आमचे रक्त हिंदुचेच; मुस्लिम आमदाराचे विधानसभेत जोरदार भाषण