खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. (shivsena dhairyasheel mane on sambhajiraje chhatrapati protest maratha reservation azad maidan)
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. तर त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेना खासदार धैर्यशील माने त्या ठिकाणी पोहोचले आहेत. ‘आपला राजा उपाशी बसला असताना आपण घरी कसे बसायचे,’ असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
तसेच ‘मी इथं छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय. दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय. आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे,’ अशी खंत धैर्यशील माने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मी संभाजीराजेंचा हा संघर्ष जवळून पाहिला आहे. राजेचं ज्यावेळचं मुंबईला आंदोलन झालं त्यावेळी राजे सर्वत्र चालत जात होते. मी त्यावेळी खासदार नव्हतो. त्यावेळी संभाजी छत्रपतींच्या एका शब्दावर मराठा समाज बांधव एकत्र आले आणि महाराष्ट्र शांत राहिला, ही परिस्थिती होती, असं धैर्यशील माने यांनी सांगितले.
तसेच मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात आणि मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारनं उपाययोजनांची ब्लू प्रिंट द्यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
“सगळ्यांना एका छताखाली कसं आणता येईल, या दृष्टीने माझा लढा आहे. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे”, असं संभाजीराजे भोसलेंनी म्हंटले आहे. “मी जी चळवळ सुरू केली आहे, त्यात समाजाला का वेठीला धरायचं? म्हणून मी ठरवलं, जे होईल ते होईल, म्हणून मागण्यांसाठी मी स्वत: आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
व्वा रे पठ्ठ्या! नवराईला न्यायला हेलिकॉप्टर, लेकीच्या निरोपासाठी अख्खा गाव जमला; लग्नाची जिल्ह्यात चर्चा
…म्हणून मला युक्रेनमध्ये जाऊ द्या; महाराष्ट्रातील भाजप खासदाराची मोदींना पत्र लिहून मागणी
जी पोर वाघाशी आणि गव्याशी झुंज देतात त्यांना तुम्हाला तुडवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टी कडाडले
मुंबई हादरली! सोशल मीडियावर झाली मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून शिक्षिकेला दारू पाजली अन्..