shivsena : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्या आणि मराठी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या दीपाली सय्यद या चांगल्याच चर्चेत आहेत. राज्याच्या राजकारणात चांगल्याच सक्रिय असलेल्या दीपाली सय्यद या आता मागे पडल्या असल्याच बोललं जातं आहे. त्या नाराज असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दीपाली सय्यद या नाराज असल्याच बोललं जातं आहे. या कारणामुळेच त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी सय्यद यांनी अनेक प्रयत्न केले होते.
यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. शिंदेंच्या भेटीनंतर दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. ‘मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटायला प्रयत्न केला. मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. मातोश्रीतील त्यांच्या जवळच्या काही लोकांनी माझा आवाज दाबल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली.
त्यानंतर आता त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. राजकीय नेते मंडळी दिवाळी साजरी करताना पाहायला मिळतं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतेच दीपाली सय्यद यांच्या रांगोळीचे फोटो समोर आले आहेत. विशेष बाब म्हणजे दिपाली सय्यदांच्या पुढील राजकीय भूमिकेचे संकेत रांगोळीतून दिसले आहे.
ठाकरे गटात नाराज असलेल्या सय्यद या शिंदे गटात जाणार असल्याच बोललं जातं होतं. मात्र आता त्यांनी रांगोळीमधून असे काही संकेत दिले आहेत की, आता सय्यद या भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जातं आहे. अद्याप सय्यद यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाहीये.
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा