shivsena : विरोधकांवर तुटून पडणाऱ्या सेनेच्या रणरागिणी दीपाली सय्यद या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्या देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच बोललं जातं आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसणार असल्याचं देखील बोललं जातं आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दीपाली सय्यद या नाराज असल्याच बोललं जातं आहे. या कारणामुळेच त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दीपाली सय्यद या पूर्वी चांगल्याच सक्रिय असल्याच पाहायला मिळत होतं.
मात्र आता अंधारे यांच्या प्रवेशामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी दिपाली सय्यद यांनी अनेक प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती.
शिंदेंच्या भेटीनंतर दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. माध्यमांशी बोलताना दीपाली यांनी थेट मातोश्रीवर निशाणा साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटायला प्रयत्न केला. मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. मातोश्रीतील त्यांच्या जवळच्या काही लोकांनी माझा आवाज दाबल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुढे बोलताना दीपाली यांनी म्हंटलं आहे की, काही वेळीपूर्वी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना भेटणं खूप सोपं होतं. यावेळी आम्ही चर्चाही केली. मात्र उद्धव ठाकरे अद्यापही नॉटरिचेबल असल्याच त्यांनी सांगितलं आहे. आता दीपाली सय्यद नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल