Share

भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”

dipali

सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच दीपाली सय्यद यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील शाब्दिक हल्लाबोल चढवला. त्यानंतर आता भाजपच्या महिला नेत्याही आक्रमक झाल्या आहेत.

भाजप नेत्या उमा खापरे (Uma Khapare) यांना थेट इशारा दिलाय.  ‘यापुढे दीपाली सय्यद यांनी कोणत्याही भाजप नेत्याबद्दल अपशब्द वापरला तर आम्ही दीपाली सय्यद यांना घरात घुसून बदडून काढू,’ असा इशारा उमा खापरे यांनी दिला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल कारवाई करावी,’ अशी मागणी देखील त्यांनी केली.

त्यानंतर आता दिपाली सय्यद यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘माझ्या घरी येऊन दाखवा,’ असं प्रतीआव्हानही दिपाली सय्यद यांनी भाजपला दिलं आहे. त्या याबाबत माध्यमांशी बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “तुम्ही काय माझ्या घऱात, शिवसेना भवनात घुसून बदडून काढणार आहात? म्हणजे तुम्हाला याव्यतिरिक्त दुसरं राजकारण करताच येत नाही. सुरुवात तुम्ही करायची आणि आम्ही काही बोललो की आम्ही वाईट होणार”, असा प्रती हल्लाबोल दिपाली सय्यद यांनी चढवला आहे.

तसेच “तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा,” असं दिपाली सय्यद यांनी म्हंटलं आहे. ‘तुम्ही जे बोलता ते सगळं शुद्ध, पवित्र… तुम्ही बोलता ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांकडे बोट करायचं. तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वाचा काय म्हणाल्या होत्या दिपाली सय्यद..?
दीपाली यांनी ट्विट करत म्हंटलं होतं की, ‘भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर नेते भाजपामध्ये जावून पवित्र होतात. त्यानंतर त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल,” अशी टिका त्यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या
काहीही झालं तरी भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे, IPL जिंकताच पांड्याचा आत्मविश्वास बळावला
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
पत्रकार परिषदेत गोंधळ; एकमेकांना मारहाण करत राकेश टिकैत यांच्यावर करण्यात आली शाईफेक
आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात फिक्सिंग? संजू सॅमसनवर चाहत्यांनी केले ‘हे’ आरोप

 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now