महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. त्यानंतर त्यांनी आता पुण्यात सभा घेत दौरा का स्थगित केला याचे कारण सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. (shivsena criticize raj thackeray)
संभाजीनगरचा उल्लेख करताना नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्या विधानावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. अरे तु आहे कोण आहे? असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेना नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने बघितला, अशी टीका दीपाली सय्यद यांनी केली आहे. सध्या दीपाली सय्यद यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.
https://twitter.com/deepalisayed/status/1528267365750026240?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528267365750026240%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fdeepali-sayed-criticize-mns-chief-raj-thackeray-over-pune-rally-via-tweet%2Farticleshow%2F91721479.cms
पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, अशी टीका दीपाली सय्यद यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद राज ठाकरेंवर खुपच आक्रमक होताना दिसून येत आहे. सभा रद्द करुन कोणताच मुद्दा शेवटपर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज साहेबांनी कायम ठेवली आहे. त्याबद्दल खंत आहे, असा टोला त्यांनी राज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्यानंतर लावला होता.
दरम्यान, सभेत राज ठाकरेंनी दौरा रद्द करण्याचे कारण सांगितले आहे. मी हट्टाने जायचं ठरवलं असतं, तरी माझे हजारो सैनिक अयोध्येला आले असते. तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि संभाजीराजेंमध्ये समेट, शिवसेना पुरस्कृत म्हणून जाणार राज्यसभेत
टाटांचा दिलदारपणा! कर्मचाऱ्यांना दिली खुली ऑफर, आता तुमच्या मुला-मुलींना नोकऱ्या सोपवा
अरे पण तू आहेस कोण?’ औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले