सध्या मनसे – शिवसेनेत बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. निमित्त ठरलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण. राज ठाकरे यांच्या भाषणांची नेहमीच राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होतं असते. अलिकडच त्यांच्या दोन सभा झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत केले वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे.
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना – मनसे आमनेसामने आली आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ईदचा म्हणजेच ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिलं आहे.असं न झाल्यास मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केले आहे.
अशातच राज ठाकरेंचा एक जुना फोटो व्हायरल करण्यात आला आहे. या फोटोमध्ये राज यांनी डोक्यावर मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलेली पाहायला मिळत आहे. खांद्यावर कापड घेतलं असून त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. राज ठाकरेंनी मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलेला जुना फोटो असणारे बॅनर्स झळकले आहेत.
वाचा नेमकं काय लिहिले आहे त्या बॅनर्समध्ये.. मध्यभागी भगव्या रंगाच्या आयतामध्ये ‘हनुमान’ असं लिहिलं आहे. तर बाजूला चार प्रश्नचिन्हं छापण्यात आली असून त्यावर ‘उद्या’ असं लिहिले आहे. यावर आता मनसेने शिवसेनेला लक्ष केले आहे. मनसेनेही शिवसेनेला बॅनरच्या माध्यमातूनच उत्तर दिले आहे.
दोन वेगवेगळ्या विचाराचे असलेल्या पक्षाबरोबर सत्ता स्थापन करून आपले विचार शिवसेना विसरली असल्याचा आरोप मनसेने काल आज आणि उद्या असे बॅनर लावत केला आहे. त्यावर सोनिया गांधी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दाखवले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची बदलती भूमिका यांच्याविरोधात शिवसेना भवन समोर हे बॅनर लावले जात होते.मात्र बॅनर लावत असताना पोलिसांनी मनसे पदाधिकार्यांच्या हातातून बॅनर काढत बॅनर लावू दिले नाहीत. मात्र सध्या मनसे – शिवसेनेत वादाची थणगी पडली असून दोघांमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
KGF 2 मधील यशचा स्वॅग पाहून भडकला ‘हा’ अभिनेता, म्हणाला, दिग्दर्शकाला आयुष्यभर तुरूंगात..
उतावळा नवरा! लग्न झाल्यानंतर आलियाला उचलून थेट मिडीयासमोर आला रणबीर, पहा भन्नाट फोटो
लग्नानंतर पहिल्यांदाच हातात हात घालून मिडीयासमोर आले रणबीर-आलिया, रोमँटिक फोटो झाले व्हायरल
किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, राऊत उघड करणार ‘ते’ घोटाळा प्रकरण, ट्विट करत म्हणाले..