भर सभेत शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल चोरणारा ‘चोरटा’ सापडला; कोण आहे चोरटा?

बुधवारी सांगली जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका चोरट्याने भर सभेत स्टेजवरून शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून पन्नास हजार रुपयांचा बंडल लंपास केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना कॅमेरामध्ये कैद करण्यात आली.

अखेर पैसे चोरणारा भामटा पोलिसांच्या हाती लागला आहे. या चोरट्याला सांगली शहर आणि मिरज पोलिसांनी जेरबंद केलं आहे. विशेष बाब म्हणजे त्याचे वय फक्त 21 वर्ष आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. चोरीच्या उद्देशानेच तो सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याला आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा चोरटा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने याआधी अशा प्रकारच्या अनेक चोऱ्या केल्या असल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाचा नेमकं काय घडलं होतं.. बुधवारी सांगलीमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मंत्री विजय वड्डेटीवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वड्डेटीवार यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यावेळी अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर जमले होते.

त्यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संजय विभुते यांच्याकडे होती. एका चोरट्याने व्यासपीठावरील या गर्दीचा फायदा घेतला आणि संजय विभुते यांच्या खिशातील ५० हजार रुपये चोरले.

कार्यक्रम संपल्यानंतर संजय विभुते त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यावेळी खिशात पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते परत कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यांनी पैशांचा शोध घेतला. पण त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. कार्यक्रमातील व्यासपीठावरील व्हिडिओ पाहत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढल्याचे संजय विभुते यांच्या निदर्शनास आले होते.

महत्त्वाच्या बातम्या
करोडो घेऊन ‘या’ 8 खेळाडूंना भोपळाही फोडता नाही आला; यामध्ये 17 कोटी घेणाऱ्या प्लेअरचाही समावेश
एसटी कर्मचाऱ्यांचा ३१ मार्चचा अल्टिमेटम संपला, संपकऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले…
तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून ५ वर्षांपासून दिग्दर्शक करत होता बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
कमाईच्या बाबतीत दीपिकाचा रणवीरलाही धोबीपछाड; आलिशान गाड्यांसह आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण