shivsena : सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही गटांनी चांगलीच कंबर कसली आहे.
शिंदे – फडणवीस सरकार पडणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतं आहे. तर दुसरीकडे खरी शिवसेना कोणाची? यावरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे 16 आमदारांवर अपात्रेची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याच मुद्यावर शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने एक खळबळजनक वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार फोडले असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
खैरे यांनी म्हंटलं आहे की, ‘कोर्टाने निर्णय दिला तर शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले जातील. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्रिपद कायम राहावे यासाठी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे. काँग्रेसची सध्या रॅली सुरू आहे. त्यामुळे सगळे शांत बसलेले आहे.’
दरम्यान, पुढे बोलताना खैरे यांनी म्हंटलं आहे की, ‘राज्यातील २२ नाराज आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. हे २२ आमदार कुठले आणि कोण आहेत? हे मात्र खैरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं नाही. मात्र काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असल्यामुळे ते सध्या शांत आहेत.’
एवढंच नाही तर पुढे बोलताना खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. याआधीही नारायण राणेंनी बंड पुकारलं होतं. त्यावेळी ते सुद्धा निवडून आले नव्हते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 40 आमदार तर पडणार असून यात शिंदे यांचा देखील समावेश असल्याच खैरेंनी म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज