Share

Shivsena : मुख्यमंत्र्यांनी फक्त ‘हे’ काम करावे, उद्धव ठाकरे दौरा रद्द करतील; शिवसेनेचे ओपन चॅलेंज

uddhav thackeray eknath shinde

shivsena challenge to cm eknath shinde | शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. पण त्यांच्या या दौऱ्यावर सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार टीका केली जात आहे. त्यांच्या टायमिंगवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. पण आता याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

यावेळी उत्तर देताना अंबादास दावने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा हा दौरा जनतेसाठी आहे. पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छितो की, तुम्ही जर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली तर उद्धव ठाकरे दौरा रद्द करतील.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करुन त्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा हा दौरा काही राजकीय नाही. राज्य सरकारने दिवाळी शिधा वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण शिधा अद्यापही लोकांपर्यंत पोहचला नाहीये. त्यामुळे हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे, असे दिसून येते.

शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी निश्चितच केला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या शिवसेनेकडून मदत पण द्यायला हवी. पण ते जर राजकारण करत असतील तर त्यांना जनता माफ करणार नाही, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले होते.

सत्तार यांच्या या टीकेला अंबादास दानवे यांनी उत्तर दिले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज देखील केले आहे. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा राजकीय नाहीये. हा दौरा जनतेसाठी आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली तर उद्धव ठाकरे त्यांचा दौरा रद्द करतील, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
 arshadeep sigh : बाबर आणि रिझवानला आउट करून प्रचंड खुश झाला अर्शदीप; म्हणाला, मला त्या क्षणाचा….
shinde group : शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर..! मंत्री आणि आमदारामध्येच जुंपली, मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी
Chandrakant Khaire : अब्दुल सत्तारांचा बंदोबस्त करणार, त्यांची सगळी लफडी.., चंद्रकांत खैरेंचा इशारा

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now