Share

shivsena : ‘हल्ले करून तुम्ही मला शांत करू शकत नाही, मी जिवंत आहे, तोपर्यंत..,’ सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी

uddhav thackeray with fadanvis

shivsena :आज राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर रात्री हल्ला करण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. आता याच प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हे सातत्याने शिंदे गटाला टार्गेट करताना पाहायला मिळत आहे. या राजकीय लढाईचे पडसाद आता घरापर्यंत गेले असल्याच यातून स्पष्ट होतं असल्याचं बोललं जातं आहे. नुकतीच जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे.

याच प्रकरणावर खुद्द जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हल्ले करून तुम्ही मला शांत करू शकत नाही. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी बोलत राहणार. पक्ष फोडून तुमचे समाधान झाले नाही, म्हणून तुम्ही विरोधी पक्षातील बोलणारी माणसं मारून जर तुमचा पक्ष वाढणार असाल, तर निश्चितपणे मला मारा. मात्र, मी माघार घेणारा कार्यकर्ता नाही”, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना जाधव यांनी म्हंटलं आहे की, “काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत.’

पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी म्हंटलं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं काही करतील असं मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावे आणि माझं सुरक्षा कवच काढलं असावं”. सध्या भास्कर जाधव यांच्या घरावर झालेला हल्ला राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now