Eknath shinde | शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद आता भरपूर चर्चेत आहे. अशातच अजून एक वाद म्हणजेच मागील वर्षी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून जळगाव शहराला रुग्णवाहिका दिली होती. ती शिंदे गटाने परत मागून घेतली. रुग्णवाहिका देण्यात व परत घेण्यात गुलाबराव पाटील यांचाच पुढाकार होता.
कोरोना काळात रुग्णांना अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका देण्यात आली होती. आता ती गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने शिंदे गटाने परत मागून घेतली. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परत दोन रुग्णवाहिका जळगाव शहराला देण्यात आल्या.
एकनाथ शिंदेसोबतच आणखी काही नेते आता शिवसेनेपासून वेगळे झाले. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण झाला आहे. कोरोना काळात रुग्णांना अत्यावश्यक सेवा म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी रुग्णवाहिका देण्यात आली होती.
मात्र, शिंदे शिवसेनेपासून वेगळे झाल्याने जळगावला देण्यात आलेली ही रुग्णवाहिका शिंदे गटाने परत मागून घेतली होती. गुलाबराव पाटील शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्यावर शिवसेनेकडून आरोप होत असतात. ते सुद्धा त्यावर उत्तर देत असतात आणि वाद वाढत जातो. अशातच शिंदे गटाने रुग्णवाहिका परत मागितल्याने वातावरण अधिकच बिघडले. त्यामुळे शिवसैनिकांचा पारा चढला.
या घटनेमुळे वादात आणखी भर झालेली आहे. शिवसैनिकांना याचा प्रचंड संताप आला होता. त्यामुळे आज त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन रुग्णवाहिका जळगाव शहराला दिल्या. कोरोना काळात प्रत्येक ठिकाणी रुग्णवाहिका कमी पडत होत्या त्यावर तोडगा म्हणून जळगावला रुग्णवाहिका देण्यात आली होती.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका देण्यात आली. तर जळगाव महानगरपालिकेच्या समोर शिवसैनिकांचे नोंदणी अर्जही भरण्यात आले. या वेळी महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, सुनील महाजन, नितीन लढ्ढा आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न भंगणार; किंमतीमधील वाढ पाहून डोळे पांढरे होतील
‘महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार, शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही’
भयानक! पुण्यात भररस्त्यात हत्येचा थरार; तरुणावर ३५ वार, सिमेंटचा दगड डोक्यात घातला
आंबेडकरी चळवळीची वाघीन आता ठाकरेंच्या मदतीला; पुण्यात शिवसेनेची ताकद वाढणार