shinde group : काल राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडली. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ शिंदे गटाने फोडला असल्याचं वृत्त समोर आलं. यामुळे ठाकरे गटाच्या गोटात एकचं खळबळ उडाली. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून 500 कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले.
मात्र आता याच बद्दलची एक वेगळी बातमी समोर येतं आहे. वरळीतील राजकीय ड्राम्याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. काल दुपारी शिंदे गटात सामील झालेले सर्व शिवसेना पदाधिकारी संध्याकाळी मातोश्रीवर दाखल झाले. यामुळे आता शिंदे गटाला धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील शिवसैनिक शिंदे गटात गेले ही खोटी बातमी असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळी कोळीवाड्या मधील सगळे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, नगरसेवक, उपविभाग प्रमुख काल मातोश्रीवर दाखल झाले.
शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शिंदे यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, ‘निष्ठा मनामध्ये शांत बसू देत नव्हती म्हणून आज सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलो. गेलेले पुन्हा परत येतील. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी या ठिकाणी एक मोठा कट रचला जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून 500 कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले असल्याचं वृत्त काल माध्यमांवर झळकले. काल वरळी कोळीवाड्यातून जवळपास 500 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचं काल माहिती मिळाली. मात्र तसं काहीच घडलं नसल्याचं आज वृत्त समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Shivsena : ठाकरे आपला हुकमी एक्का काढणार बाहेर? बॅनरवरील फोटोनंतर चर्चांना उधाण, बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचीही होतेय चर्चा
Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी कोणी दिली; तपासात आला मोठा ट्विस्ट
eknath shinde : शिंदे गटाने ठाकरे गटाला दिला मोठा झटका! आदित्य ठाकरेंचा अख्खा मतदारसंघचं फोडला
eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा नेमकं काय घडलंय?