Share

पुण्याचा शिवराज राक्षे ठरला २०२३ चा महाराष्ट्र केसरी; महेंद्र गायकवाडला चितपट करत जिंकली फायनल

महाराष्ट्र केसरी 2023 चा अंतिम सामना पुण्यात झाला. या स्पर्धेत अंतिम सामन्यात पुण्याच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करत  फायनल जिंकली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील असलेला शिवराज राक्षे ठरला आहे २०२३ चा महाराष्ट्र केसरी. त्यानंतर तुफान जल्लोश करण्यात आला.

दोन उपांत्य फेरीत चार बलाढ्य पैलवान आमनेसामने आले. त्यांच्यातील दोन उपांत्य फेरीत, दोन कुस्तीपटूंनी फायनलसाठी लढत दिली. उपांत्या फेरीत जिंकलेल्या या दोन्ही कुस्तीपटूंना अंतिम सामन्यासाठी एक तास देण्यात आला होता. त्या दरम्यान दोन्ही कुस्तीपटूंनी चांगलीच पुर्वतयारी केली होती.

त्याचबरोबर पहिल्या उपांत्य फेरीत मॅट विभागातील शिवराज राक्षे आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत माती विभागातील महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली. त्यामुळे या दोन विजयी पैलवानांमध्ये अंतिम सामना रंगला होता. दोन्हीही पैलवान तुल्यबळ होते. तरीही अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला. अवघ्या २ मिनिटाच्या आत शिवराज राक्षेने बाजी मारली.

महाराष्ट्र केसरीच्या दोनही उपांत्य फेरीच्या फेऱ्याही अतिशय रोमांचक होत्या. मॅट विभागात हा चुशीचा सामना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाला. या चुरशीच्या लढतीत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवराज राक्षे यांनी बाजी मारली.

माती प्रकारातील दुसरा उपांत्य सामना लातूरचा सिकंदर शेख आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. हा सामनाही तितकाच रोमांचक होता. दोन्ही मल्ल शक्तिशाली होते. मात्र महेंद्र गायकवाडने अत्यंत कुशलतेने 8-2 अशा फरकाने विजय मिळवला. पण या कुस्तीवेळी सिकंदर शेखवर अन्याय झाला असे मतही अनेक जणांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पहिले दोन उपांत्य सामने पाहिले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.

“महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच पदक जिंकतील. आपल्या राज्यातील खेळाडूंना 2 वर्षापासून पगार मिळत नाही. ज्यांना 6 हजार मिळत होते त्यांना आता 20 हजार मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर कुस्तीपटूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

‘ज्येष्ठ खेळाडूंना २५०० मानधन दिले जाते, आता त्यांना ७५०० मानधन दिले जाईल’, अशी घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. या घोषणेचा जुन्या पिढीतील कुस्तीपटूंना खूपच फायदा होईल. अनेक जुने कुस्तीपटू सद्या हलाखीच्या परिस्थीतीत राहतात त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस इथेच थांबले नाहीत. महाराष्ट्र केसरी विजेत्या स्पर्धकांसाठी त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली. महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या
पोरगा कुस्तीपटू व्हावा म्हणून बापाने ५ एकर विकली, पोराने महाराष्ट्र केसरीत सुवर्णपदक मिळवत केलं चीज
kolhapur : धक्कादायक! कुस्तीच्या सरावानंतर घडलं विपरीत; पंढरपुरच्या पहिलवानाचा कोल्हापुरात दुर्दैवी अंत
हा माझा हिंदुस्थान आहे, इथे हिंदूंचा जीव महत्वाचा आहे;, उदयपूर घटनेवरून कुस्तीपटू बबिता फोगट संतापली

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now