Share

”शिवसेना वाढवण्यात जे मोजके नेते त्यापैकीच एक राणे होते, तेव्हा राऊत कुठे होते”

sanjay raut

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) हे भाजपवर सातत्याने हल्लाबोल चढवत आहेत. तसेच राऊत रोज नवे खुलासे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतच बोलताना राऊत यांनी भाजपनेते नारायण राणे यांना लक्ष केले होते. ‘आम्ही तुमचे ‘बाप’ आहोत, याचा अर्थ काय ते तुम्हाला चांगलेच माहीत आहे,’ असा गर्भित इशारा देखील राऊत यांनी दिला. (shivaji mane criticizes shiv sena leaders)

याबाबत बोलताना राऊत म्हणाले होते की, ‘आमची कुंडली आहे, अशी धमकी नारायण राणे देत आहेत. धमक्या देणे बंद करा. तुमची कुंडलीही आमच्याकडे आहे. तुम्ही केंद्रीय मंत्री असाल पण हा महाराष्ट्र आहे. ते विसरू नका. आम्ही तुमचे ‘बाप’ आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत यांच्या विधानावरून आता चांगलेच राजकारण रंगले आहे. नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र शिवसेनेमधील माजी खासदारानेच संजय राऊत यांना लक्ष केले आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेमधून धुसफूस ही चव्हाट्यावर आली आहे. याबाबत हिंगोलीचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी संजय राऊत यांना घरचा आहेर दिला आहे. “साहेबांना (बाळासाहेब ठाकरेंना) संरक्षण देताना राणेंनी जीवाची पर्वा केली नव्हती.”, असे म्हणत शिवाजी माने यांनी राऊतांवर टीका केली आहे.

सध्या शिवाजी माने यांची ही फेसबुक पोस्ट तूफान व्हायरल होतं आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कुणी किती कष्टाने कमाई केली आहे. ते संजय राऊत कोण होते त्यांचा पगार किती होता ते , किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते? बरं राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागलेतं.

त्यांना मुख्यमंत्री पदी बसविले होते त्या वेळी ते काय धुतल्यां तांदळा सारखे होते कायं? बरं साहेबांना संरक्षण देण्यासाठी त्यांनीच त्याच्या जिवाची पर्वा केली नव्हती. हे विसरलात का? मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यात मोजून काही मंडळी होती त्यांत राणे होतेचं ना, असे शिवाजी माने यांनी म्हंटले आहे.

https://www.facebook.com/shivaji.mane.796/posts/4369089603192699

तसेच पुढे माने म्हणतात, ‘आम्ही कुणाशी भांडत आहोत (आपल्याशीचं) नं, काँग्रेस व राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे. अजित दादां वगळता या विषयावर कुणी भाष्य केलयं हे ऐकविण्यात किंवा वाचण्यात नाही. गोर-गरिबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत. अशाने काय साध्य होणार आहे.”

महत्त्वाच्या बातम्या
व्यक्तीने जाहीरपणे विचारली होती बबीताला एका रात्रीची किंमत, अभिनेत्रीने केले होते ‘हे’ काम
चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड, कोर्टाचा मोठा निर्णय
पिंपरी चिंचवडमध्ये Whats app वर सुरू होते सेक्स रॅकेट, एका रात्रीत २० हजार कमवत होत्या मुली
विराटच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मिडीयाला रोहितने झापले, म्हणाला, तुम्ही गप्प बसलात तर..

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now