कोरोनाच्या संकटामुळे राज्यात गेल्या दोन वर्षात कोणताही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. कोरोनामुळे प्रत्येक सण उत्सव, जयंतीवर निर्बंध राहिले आहेत. मागील दोन वर्ष मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे.
यामुळे राज्य सरकारने शिवजयंती उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने ही नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे आज आम्ही तुम्हाला अशा एका शिवभक्ताची गोष्ट सांगणार आहोत वाचून नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे राहणाऱ्या सचिन भोयर यांनी त्यांच्या बंगल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. घर बांधतेवेळी पाच फुट उंचीचा पुतळाही बसवला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी अंगिकारले आहे.
तसेच ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. याबाबत बोलताना तेथील स्थानिक नागरिक सांगतात की, ‘पुजनेनंतरच सचिन आपल्या कामाला सुरुवात करतो. पुतळ्यावरून राजकारण न करता आपल्या घरावरच पुतळा बसवावा. तरुणांनी छत्रपतींचा विचाराने मार्गक्रमण करण्याचा संदेश पुतळा उभारून सचिन देत आहे.’
तसेच कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे या वर्षीच्या शिवजयंतीनिमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी प्रतिमा साकरण्यात आली आहे. शिवजयंतीनिमित्त सहा हजार वृक्षरोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा पाहण्यासाठी शिवभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
दरम्यान, येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.
महत्त्वाच्या बातम्या
‘मी सुंदरकांड यासाठी केलं कारण माझी पत्नी सुंदर आहे, मी कांड करत असतो’, आमदाराचे बेताल वक्तव्य
कोरोनाबाधित पत्नीला वाचवण्यासाठी पतीने खर्च केले तब्बल १.२५ कोटी आणि मग…
बाळाचं नाव पंतप्रधान ठेवणं दाम्पत्याला पडलं महागात; जाणून घ्या नक्की काय घडलं
दारूच्या नशेत धुंद होती अभिनेत्री, पोलिसांना केली शिवीगाळ, चालत्या व्यक्तीवर चढवली गाडी