Share

शिवसेनेची गळती सुरूच, नागपूरातून मोठा धक्का देत ‘हा’ बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपशी युती केली आणि सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, खासदार शिंदे गटात गेले आहेत, अजूनही शिवसेनेला लागणारी गळती थांबली नाही.

आता शिवसेनेचे नागपुरातील सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काशीकर यांनी शिवसेना सोडल्यामुळे पक्षाला नागपुरात मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार, ऑपरेशन गुवाहाटी आणि ऑपरेशन सुरतमध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली, असे शिंदे गटाचे नेते किरण पांडव यांची भेट घेतल्यानंतर मंगेश काशीकर यांनी राजीनामा दिला आहे अशी चर्चा सुरू आहे. काशीकरांच्या पूर्वी नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संदीप ईटकेलवार यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

संदीप ईटकेलवार यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आता काशीकरांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे हे आपल्या पक्षातील गळती रोखण्यासाठी जोरकस प्रयत्न करताना दिसत आहेत.

पण, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मिळत नाहीत. रामटेकचे शिवसेना समर्थीत आमदार आशिष जयस्वाल गुवाहीटीतच शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर रामटेकचेच खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदे गटाची वाट धरली होती, आणि आता जिल्हाप्रमुख ईटकेलवार आणि संपर्कप्रमुख काशीकर यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठा फटका धक्का बसला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची उभारणी करण्यासाठी सभांचा धडाका लावला आहे. मोठे शक्तिप्रदर्शन त्यांच्याकडून केले जात आहे. सर्वच ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पण त्यांचा प्रभाव विदर्भात मात्र कुठेही दिसत नाही. एका पाठोपाठ एक नेते शिवसेना सोडून शिंदे गटाकडे जात आहेत, असेच चित्र दिसत आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now