shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठी बंडाळी घडून आल्यानंतर शिवसेना पक्षाला अनेक हादरे बसले. आमदार, खासदार, निष्ठावंत नेते, पदाधिकारी, अनेकांनी उद्धव ठाकरे यांचे साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या दिशेने पाऊलं टाकली. याच प्रकारे एक नवा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरच्या काळात शिवसेनेची वादळी वाटचाल सुरू झाली. त्यानंतर शिवसेनेने राजकारणात प्रवेश केला. वामन महाडिक यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला. महाडिक यांनी विधानसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले. त्यांचीच कन्या आता शिंदे गटात सामील झाली आहे.
शिवसेनेच्या विधानसभेतील प्रतिनिधित्वाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाडिकांची कन्या शिंदे गटात सामील होणे हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांसाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आहोत, अशा प्रकारची प्रतिक्रिया महाडिक यांच्या मुलीने दिल्याचे समजते.
वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले विधानसभेचे आमदार परळ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. कॉम्रेड. कृष्णा देसाई यांची १९७० साली हत्या झाली. तेच या परळ मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये डाव्या पक्षाने देसाईंच्या पत्नीलाच उमेदवारी दिली. समाजवादी पक्ष आणि १३ इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता.
मात्र त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले वामन महाडिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, स्वतंत्र पक्ष यांनी पाठिंबा दर्शवला होता. ऑक्टोबर १९७० ला झालेल्या या निवडणुकीत वामनराव महाडिक निवडून आले होते. महाडिक सुरुवातीच्या काळात महापालिकेत साधे कर्मचारी होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांनी काही काळ काम केले.
एकदा बाळासाहेबांची एक सभा बघून शिवसेनेच्या विचारांकडे प्रभावित झालेल्या महाडिक यांनी शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली होती. परळ मतदारसंघात नगरसेवक असलेल्या महाडिकांना बाळासाहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिली होती. तेच महाडिक पुढे पहिले आमदार ठरले आणि पुढच्या काळात लोकसभेची निवडणूक जिंकून शिवसेनेचे दक्षिण- मध्य मुंबईचे पहिले शिवसेना खासदार बनण्याचा मान सुद्धा वामनराव महाडिक यांनी मिळवला होता. त्याच महाडिक यांच्या मुलीने शिवसेनेत फूट पडल्यानंतर आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Suryakumar Yadav : आयसीसी क्रमवारीत सुर्यकुमार यादवची मोठी झेप; दिग्गजांनाही दिला धोबीपछाड, ‘या’ स्थानावर मारली उडी
health : रोगापेक्षा इलाज भयंकर! वेदनाशामक गोळी घेणं जीवावर बेतू शकतं, काय आहेत दुष्परिणाम?
shinde : मुख्यमंत्री होण्यामागे कुणाची कृपा? शिंदेंनी राजकीय नेत्याचं नव्हे तर ‘या’ व्यक्तीचे घेतलं नाव, अनेकांच्या भुवया उंचवल्या