Share

Shivsena: शिवसेना खेळणार मोठा डाव! ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य उतरणार राजकारणाच्या मैदानात

tejas thakre

शिवसेना(Shivsena): शिवसेनेतील ४० आमदार व १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना डबघाईला आली. राज्यातील सत्तासंघर्ष सुरूच आहे. अशातच आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन एक्का राजकारणात उतरवण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे हे आता राजकारणात पदार्पण करू शकतात.

तेजस ठाकरे यांच्याभोवती ‘ब्रँड ठाकरे’चे वलय असल्याने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण आहे. त्यामुळे आता शिवसेना संकटात असताना तेजस ठाकरेचे राजकारणात पदार्पण करणे लाभदायक ठरू शकते. तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. सद्यस्थितीमध्ये आदित्य ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी शिवसंवाद यात्रा काढून लोकांशी संवाद साधला.

त्यांचे काम सुरु असतानाच आता तेजस ठाकरे राजकारणात येणार का? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार अश्या चर्च्यांना उधाण आले होते. पण प्रत्यक्षात तसे घडले नव्हते. राजकारणातील काही घटना सोडल्या तर तेजस ठाकरे राजकारणातून दूरच होते. परंतु, आता शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून गेले. त्यामुळे तेजस ठाकरे राजकारणात उतरून पक्षाला नव्याने उभं होण्यासाठी बळकटी देऊ शकतात.

तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय नाही. परंतु, त्यांनी शिवसेना पक्ष संघटना व ठाकरे परिवारासाठी कार्ला गडावर येऊन देवीचे दर्शन घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू आहे. त्यात शिंदे गट आणि शिवसेना असे दोन गट पडले आहेत. शिवसेना नाव व धनुष्यबाण या चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहलंय. या दोन गटांमद्ये कायदेशीर लढाई सुरु आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे हे कोल्हापूर दौरा करत होते. कोल्हापूर दौरा संपल्यानंतर कार्ला गडावर येऊन आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. तेजस यांनी लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेतले. शिवसेनेवर आलेले राजकीय संकट दूर होऊ दे अशीदेखील प्रार्थना केली. जेव्हा जेव्हा ठाकरे कुटुंबियांवर संकट आले. त्या त्या वेळी ठाकरे परिवारातील सदस्यांनी आई एकवीरेच्या पायावर माथा टेकवत यश मिळावे, असे साकडे घातले.

यश मिळाल्यानंतर गडावर येऊन ठाकरेंकडून नवस देखील फेडल्याची अनेक उदाहरणे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात शिवसेना लयास जाईल का, असा प्रश्न उठला आहे. मात्र, तेजस ठाकरे यांनी एकवीरा आईचे दर्शन घेतल्याने शिवसेनेवर आलेली संकटे दूर होतील का? तेजस ठाकरे यांनी मागितलेली मनोकामना पूर्ण होणार का? शिवसेना पुन्हा उभारी घेणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
Mumbai: बिल्डींगमध्ये राहणारी ती महीला शेजाऱ्यांना पाठवायची पाॅर्न व्हिडीओ; सत्य समजल्यावर सगळेच हादरले
Mumbai: बिल्डींगमध्ये राहणारी ती महीला शेजाऱ्यांना पाठवायची पाॅर्न व्हिडीओ; सत्य समजल्यावर सगळेच हादरले
आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन; कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट
सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वकीलांचा खणखणीत युक्तिवाद; शिंदे गटाचे टेन्शन वाढले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now