महाराष्ट्रभर बहुचर्चित असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात सहा जागांसाठी हे मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्याच सत्र जोरदार चालु झालं.
या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेला मोठा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे.कोल्हापूरचे शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक हे विजयी झाले. सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशी पाहायला मिळाली. याविषयी बोलताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
“पक्षनिष्ठे समोर मी बायकोचं ही ऐकत नसतो, उद्या तिने अमुक माझा भाऊ आहे, असे सांगितले अन् ते पक्षहिताच्या आड येणार असेल, तर मी त्याला मदत करणार नाही” पुढे ते असेही म्हणाले “फटके खाल्ल्याशिवाय शिवसेनेला शहाणपण येणार नाही”, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, कोल्हापूरचे शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याचे मला दु:ख आहे. ते आमच्या जवळचे आहेत, पण माझ्यासाठी “पक्षहित महत्त्वाचे आहे, आणि पक्षनिष्ठेसमोर मी बायकोचं ही ऐकत नसतो”. विशेष म्हणजे धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचा आग्रह देखील पाटील यांनीच धरला होता आणि शेवटी महाडीक यांना विजय करून पाटील यांनी आपला आग्रह योग्य व्यक्तीचा होता हे सिद्ध केले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली यशस्वी खेळी पाहुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार यांनी ही फडणवीस यांना मत मिळविण्यात आलेल्या यशाचे श्रेय दिले हे चांगले झाले. फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. ते कुणाच्या हातात येत नाही, त्यांनी शिवसेनेचा “करेक्ट कार्यक्रम” केला. असे म्हणत आता आम्ही विधान परिषदेच्या सहा ही जागा जिंकू, असा भविष्याचा वेध घेणारे सूचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
राज्यसभेच्या निकालाच्या दिवशी काय झालं होतं मला माहितीये, त्यारात्री…; संजय राऊतांनी केले गंभीर आरोप
अपक्षांना बदनाम करून नका, ‘या’ गोष्टीमुळे महाविकास आघाडीचा गेम बिघडला; बच्चू कडू स्पष्टच बोलले
भाजपने डावलल्यानंतर पंकजा मुंडे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत?
भाजपाकडे ११३ मतांचा कोटा असताना १२३ मते कशी व कुठून आली? भाजपाच्या यशाचं रहस्य झालं उघड