Share

शिवसेना काहीच दिवसांत संपून जाईल; जे.पी. नड्डांच्या या वक्तव्यावर ठाकरे संतापले; म्हणाले दुसऱ्यांना संपवण्याच्या नादात…

देशात कोणत्याही राजकीय पक्षात भाजपशी लढण्याची ताकद राहिलेली नाही. देशातील सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील आणि भाजपच शिल्लक राहील. महाराष्ट्रात शिवसेना संपत चालली आहे. तिथे आता केवळ कमळ फुलणार, अशा प्रकारचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केल्यामुळे देशातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. (Shiv Sena will end in few days; Thackeray got angry on this statement of JP Nadda)

नड्डा यांच्या वक्तव्याबाबत अनेक स्तरावरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी जे.पी. नड्डा यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘राजकारणात बुद्धीचा नाही तर बळाचा वापर केला जात आहे. नुसते बळ तुमच्याकडे आहे. पण लक्षात ठेवा, वेळ कधी ना कधी बदलत असते.’

पुढे ते म्हणाले की, ‘तुम्ही दुसऱ्यांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर, सगळेच दिवस सारखे नसतात. दिवस फिरले तर आपलं काय होईल? याचा विचार जे.पी. नड्डा आणि भाजप पक्षाने करावा.’

‘सत्तेचा फेस अंगावर आहे. तोपर्यंत ते आमच्यावर टीका करू शकतात. पण एकदा तो फेस उतरला तर सत्य परिस्थिती समजेल. सोबती येतील ते आपले अशी पूर्वीची नीती असायची. पण आता सोबत येतील ते आपले, गुलाम होतील ते काही काळापुरते आपले, असा सगळा कारभार चालू आहे, अशी झणझणीत टीका उद्धव ठाकरेंनी केली.

पुढे असेही ते म्हणाले की, ‘सोबत येतील ते नाही तर गुलाम होतील ते काही काळ आपले त्यानंतर नवीन गुलाम येतील, अशा प्रकारे गुलामगिरीकडे सुरू झाली आहे. सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे.’

‘देशात लोकशाही वाचवायची असेल, जिवंत ठेवायची असेल तर प्रादेशिक पक्षांची एकजूट महत्वाची आहे. देशात अनुशासन पाहिजे म्हणून आम्ही आणीबाणीला पाठिंबा दिला होता. तेव्हा जेव्हा राजकारणाशी संबंधही नव्हता. पु ल देशपांडे, दुर्गा भागवत या जेष्ठ साहित्यिकांनी लोकशाहीच्या अग्नीकुंडात उडी मारली होती. लोकशाही जिवंत ठेवली होती. त्यामुळे लोकांनी एकत्र आले पाहिजे. वेळ अजूनही गेलेली नाही, असे उद्धव ठाकरेंनी जनतेला आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या-
मला संजय राऊतांचा अभिमान, त्यांचा मरण आलं तरी शरण जाणार नाही हा बाणा मला आवडतो – उद्धव ठाकरे
Rasik Dave: सिद्धार्थ शुक्ला अन् मलखाननंतर आणखी एका अभिनेत्याचे निधन, फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा
singer: ‘हर हर शंभू’ गाणे गायल्याने इंडियन आयडल फेम गायिकेवर भडकले मुस्लिम कट्टरपंथी, म्हणाले…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now