एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर १२ खासदारांना पण आपल्या गटात सामील करून घेतले. शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता खासदार सुद्धा फुटले आहेत. १२ खासदारांनी त्यांच्या स्वतंत्र गटाचे दिलेले पत्र लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारल्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. शिवसेना आता या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. (Shiv Sena saw ‘that’ mistake, a new petition in the Supreme Court)
शिवसेनेचे म्हणणे आहे की, लोकसभा अध्यक्षांना १३ जुलै रोजी आम्ही पत्र दिले होते. त्यामध्ये विनायक राऊत यांना संसदीय पक्षनेतेपदी नियुक्त करण्याच्या निर्णयास मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती.
तरीदेखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यानंतर १९ जुलैला आलेल्या १२ खासदारांच्या गटाचे पत्र स्वीकारले. त्यामध्ये राहुल शेवाळे हे गटनेतेपदी तर भावना गवळी प्रतोदपदी असण्याला मान्यता देण्यात आली आहे.
लोकसभा अध्यक्षांनी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत शिवसेनेच्या १२ खासदारांच्या गटाचे पत्र स्वीकारल्याचे म्हंटले आहे. भावना गवळी यांना प्रतोद म्हणून मान्यता मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे समर्थक ६ खासदारांना पण त्यांनी दिलेला व्हीप लागू होतो. तो मानला नाही तर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.
लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय मान्य नसल्यामुळे शिवसेना पक्ष लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
आधीच १६ आमदारांचा अपात्रते संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. त्यामध्ये आता शिवसेना पक्ष पुन्हा एकदा नवी याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. ही याचिका खासदारांनी संदर्भात असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
हृदय पिळवटून टाकणारी घटना; लटकलेल्या वायरचा बैलाला शाॅक अन् मालकासहीत सगळेच ठार
मी टू मुव्हमेंटमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीचे पुन्हा गंभीर आरोप; म्हणाली, मी आत्महत्या करणार….
Bumrah पेक्षा खतरनाक होते ‘हे’ तीन गोलंदाज, तरीही संघातून झाली हकालपट्टी, नावं वाचून हादराल