राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी सरासरी 81 टक्के तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तसेच अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींसाठी आज मतमोजणी प्रक्रिया सुरू होत आहे. यात पारनेर नगर पंचायतचा देखील समावेश आहे. ही निवडणूक शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके समर्थक यांच्यात होत आहे. शिवाय शहर विकास आघाडीनेही निवडणुकीत उमेदवार उतरविले होते.
परंतु सुरवाती कल पाहता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत पहायला मिळत आहे. त्यामुळे पारनेर नगर पंचायत त्रिशंकूच्या दिशेने वाटचाल करत असल्याची स्थिती आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटीही मैदानात होत्या.
परंतु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आशा मालवल्या असल्या तरी तुल्यबळ लढत पहायला मिळत आहे.सकाळी 11 वाजेपर्यंत 10 जागांचा निकाल हाती आला असून शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 5, अपक्ष 1 जागा मिळाल्या आहेत.
राष्ट्रवादीने खेळी करीत नवख्या उमेदवाराला औटी यांच्या विरोधात उभे केले होते. अवघ्या बारा मतांनी झालेला हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये पारनेरच्या माजी सभापती आणि औटी यांच्या पत्नी जयश्री यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती.
त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हिमानी बाळासाहेब नगरे यांना उमेदवारी दिली होती. नगरे यांना ३७५ तर औटी यांना ३६३ मते मिळाली. १३ मते नोटाला मिळाली. थोडक्यात झालेला हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुष्पाने धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा १०० कोटींचा आणखी एक सिनेमा हिंदीत प्रदर्शित होणार
आपल्या ‘या’ गर्लफ्रेंडसाठी सलमानने धरले होते सुनील शेट्टीचे पाय; वाचा पुर्ण किस्सा
फक्त एका मताने नारायण राणेंच्या हातून कुडाळ नगरपंचायत निसटली; वाचा धक्कादायक निकाल
आपल्या ‘या’ गर्लफ्रेंडसाठी सलमानने धरले होते सुनील शेट्टीचे पाय; वाचा पुर्ण किस्सा