Share

ब्रेकींग न्युज! शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई

शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि ज्यांची धारदार वक्तव्य कायम चर्चेचा विषय ठरतात असे खासदार संजय राऊत यांना अटक झाली आहे. आज चौकशीसाठी ईडीचे पथक राऊतांच्या घरी धडकले. सकाळपासून सुरू असलेल्या या चौकशीच्या शेवटी आता राऊत त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. (Shiv Sena leader Sanjay Raut arrested; A major action by ED)

संजय राऊत जेव्हा या पूर्ण चौकशीनंतर त्यांच्या घराच्या गेट जवळ आले. तेव्हा त्यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या दिशेने हात दाखवला आणि भगवा फडकवला. त्यानंतर ते ईडी पथकाच्या गाडीमध्ये जाऊन बसले.

सकाळपासून संजय राऊत यांच्या घराबाहेर असंख्य शिवसैनिकांचा जमाव गोळा झाला आहे. ईडीच्या कारवाईला त्यांच्याकडून विरोध केला जातोय. संजय राऊतांना ईडीचे पथक अटक करून घेऊन जात असताना, अडचण निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या फार जवळचे मानले जातात. प्रवीण राऊतांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यावर ८३ लाख रुपयाची रक्कम पाठवल्याचे समोर आले.

त्यानंतर संजय राऊत कुटुंबीयांनी त्या रकमेतून दादर येथे एक फ्लॅट विकत घेतला. या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या सर्व संपत्तीवर ईडीने टाच लावत पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कसून चौकशी सुरू केली. त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत या पत्राचाळ आर्थिक घोटाळ्यात फसलेल्या प्रवीण राऊत यांच्या पत्नीसोबत अनेक संपत्ती व्यवहारात भागीदार आहेत. तसेच याच प्रकरणात अडकलेले सुजित पारकर हे राऊतांच्या मुलीचे एका व्यवसायात भागीदार आहेत, अशा गोष्टी चौकशी दरम्यान समोर आल्याचे बोलले जाते. या सर्व गोष्टींमुळे आता संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-
कोश्यारींच्या वक्तव्यानंतर भाजपमध्येच दोन परस्पर विरोधी मतप्रवाह; समर्थन करणारे नितेश राणे एकटेच
राज्यात आता निवडणूका झाल्यास कुणाची सत्ता येणार? सर्वेतून धक्कादायक माहिती आली समोर
कालच शिंदेगटात गेलेल्या खोतकरांवर रामदास कदमांचा हल्ला; खोतकरांनी पैसै खाल्लेत म्हणून ते घाबरत आहेत..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now