राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी, विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. अशातच एक राजकीय वर्तुळातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अज्ञात व्यक्तींकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वाचा नेमकं घडलं काय..?
ही धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील संतोषी माता रोड परिसरात घडली आहे. कल्याणमध्ये (Kalyan Crime News) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर संतोषी माता रोड परिसरात हल्ला करण्यात आला आहे. मात्र हल्ला का करण्यात आला? याचे कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
या हल्ल्याबाबत मिळालेल्या महितीनुसार, बुधवारी सकाळी हर्षवर्धन पालांडे हे कल्याण पूर्वेतून संतोषी माता रोड परिसरातून गाडीतून जात होते. धक्कादायक बाब म्हणजे शिवेसनेत खूप उडतोयस असं म्हणत अज्ञात हल्लेखोरांनी हर्षवर्धन पालांडे (Harshvardhan Palande) यांच्यावर हल्ला केला.
या जीवघेण्या हल्ल्यात हर्षवर्धन पालांडे हे थोडक्यात बचावले आहेत. मात्र पालांडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. पालांडे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करणयात आलं. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत. राजकीय स्पर्धेतून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप हल्ला करणाऱ्यांचा शोध लागलेला नाहीये. आता हा हल्ला नेमका कुणी केला ? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही दिवासंपूर्वीत भायखळ्यातही अज्ञातांनी शिवसेनेच्या दोघा कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे आता भीतीचे वातावरण पसरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
तुम्ही घोटाळे करायचे, लफडी करायची अन् फाईल्स उघडल्या की पक्षप्रमुखांच्या नावाने..; ठाकरेंनी बंडखोरांना झापले
“युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण…”, राहुल शेवाळे यांनी केला मोठा खुलासा
पुण्यातील इलेक्ट्रिक बाईक शोरूमला आग, ७ बाईक्स जळून खाक, ओव्हर चार्जिंगमुळे झाला घात
बेबी बंप लपवताना पती अभिषेकसोबत दिसली ऐश्वर्या, एवढी मोठी झालीये अराध्या, पहा व्हिडीओ