मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांशी व शिवसैनिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ अभियानाची घोषणा करण्यात आली.
राज्यातील राजकीय स्थिती, शिवसंपर्क अभियान, आणि आगामी निवडणुकांची पार्श्वभूमीवर अशा विषयांवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ अभियानाची घोषणा करण्यात आली. शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे.
यावेळी ते म्हणाले
तुमच्यासोबत दौरे करण्यासाठी मी धोका पत्करून शस्त्रक्रिया करून घेतली आहे. आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. तुम्ही संघटनेवर जोर द्या, बाकीचं मी बघून घेतो , असं आवाहन त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने कोकण , पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना , जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेना मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
” गट प्रमुख , शाखाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या याद्या मला हव्या आहेत. जन्मापासूनच शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे, गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या, शिवसेना आपल्या वाढवायची आहे, गावागावातील जनतेला आम्ही तुमच्यासोबत आहोत हे त्याला समजू द्या “, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
” शिवसेना अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे , गावाची जनतेची कामं घेऊन या, लोकांसाठी कामं करा आणि संघटनेवर जोर द्या, माझ्या दौऱ्याचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल , तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो ” , असं ते यावेळी म्हणाले .
महत्वाच्या बातम्या
‘शिवसेनेने हिंदूत्व सोडलं म्हणून मी शिवसेना सोडतोय’ म्हणत माजी खासदाराने केला भाजपात प्रवेश
राणा दाम्पत्याची सुटका नाहीच, कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला; ‘या’ दिवशी होणार निकाल
राणा दाम्पत्याची सुटका नाहीच, कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला; ‘या’ दिवशी होणार निकाल
“ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्री पदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय, त्यांनी हिंदुत्वावर बोलूच नये”