Share

politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

cm shinde and thakare

politics : शिवसेनेत बंडखोरीमुळे मोठी फूट पडल्यानंतर सुद्धा ज्या ठिकाणाहून शिंदे गटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या नाशिकमध्ये आता अभेद्य शिवसेनेला हादरा बसणार आहे. जवळजवळ १७ माजी नगरसेवक शिंदे गटात लवकरच प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, असे बोलले जाते. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

दोन आमदार, एक खासदार नाशिकमधून शिंदे गटात सामील झाले असले तरीही त्याचा फारसा परिणाम नाशिकमधील शिवसेना पक्षाच्या संघटनेवर झाला नव्हता. मात्र खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.

त्यांच्या प्रयत्नांमुळेच सर्वात मोठी महानगरपालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी संघटना असलेल्या नाशिक म्युनिसिपल कर्मचारीसेनेचे प्रमुख प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अल्पावधीतच महानगरप्रमुख पद शिंदे गटाकडून देण्यात आले. त्यानंतर नाशिकमध्ये शिवसेनेचे संघटन वाढवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे.

ते सुनील ढिकले यांनी पण शिंदे गटाचा गटात सामील होणे पसंत केले. त्यामुळे नाशिकमधील शिवसेनेच्या संघटनात्मक एकीला तडा गेला. तसेच अनेक माजी नगरसेवकांवर, पदाधिकाऱ्यांवर आपापसातच शिंदे गटात गेल्याचा टॅग एकमेकांवर लावला जातोय. त्यामुळे अनेकांना आम्ही शिवसेनेसोबतच आहोत, असे रोज सांगावे लागते. याला वैतागूनच काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचे दिसते.

संजय राऊत यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई झाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेनेला कोणी वाली राहिला नव्हता. त्यानंतरच शिवसेनेत नाशिकमध्ये असंतोष उफाळून आला. त्याचाच फायदा शिंदे गटाने घेत अनेकांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न केले.

येत्या काळात नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे गटात सामील झालेल्या तिदमे यांनी शिवसेनेत साचलेपण आले होते म्हंटले. तर उद्धव ठाकरे समर्थक असणाऱ्या बडगुजर यांनी त्यावर प्रतिक्रिया देत प्रवीण तिडमे यांनी राजकीय आत्महत्या केल्याचे म्हंटले.

महत्वाच्या बातम्या-
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!
politics : ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच एक नंबर! पवारांनी थेट आकडेच सांगितले, भाजपचा दावा काढला खोडून
Raju Srivastava : कार्डियाक अरेस्टमुळे गेला राजू श्रीवास्तव यांचा जीव, तुम्हीही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now