Share

Saamana : ‘आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली’

Uddhav Thackeray

Saamana : शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून सतत एकमेकांवर टीका करण्यात येत आहेत. त्यातच शिंदे गटावर टीका करण्यासाठी शिवसेना अनेकदा सामनाचा वापर करत असते.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे गट आणि भाजपवर शिवसेनेकडून टीका करण्यात येत असते. आजही सामनातील अग्रलेखातून अशीच टीका करण्यात आली आहे. मिंधे गटाला पुढे करून कमळाबाई नियम व कायद्यास नाचवते, अशी खोचक टीका आज सामनातून करण्यात आली आहे.

आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली. सत्तापक्ष म्हणून मिळालेल्या अधिकारांचा अनिर्बंध वापर करून राजकीय स्वार्थासाठी घटनात्मक संस्थांना राजकीय अड्डे बनविण्याचा प्रयत्न करून देशभरात अराजक माजवणारे कितीही मस्तवाल झाले तरी आम्ही निश्चिंत आहोत, असे आज सामानाच्या अग्रलेखात सांगण्यात आले आहे.

तसेच या देशात न्याय आहे. लोकशाही जिवंत आहे. कायदे, पुरावे आणि लोकभावना तुडवून कोणतीही घटनात्मक संस्था पुढे जाणार नाही, याविषयी आम्हाला खात्री आहे. सर्व प्रकारच्या लढाईस आम्ही सज्ज आहोत. सवाल न्याय आणि सत्याचा आहे! महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचाही आहे. समझनेवालों को इशारा काफी है!, असे म्हणत शिवसेनेने निशाणा साधला आहे.

मिंधे गटास पुढे करून कमळाबाई नियम व कायद्यास नाचवत आहे. सर्व घटनात्मक संस्था कमळाबाईने आपल्या ‘पदरी’ खोचून ठेवल्याने बेईमान गटास दिलासे मिळत आहेत, असे या गटास भासविले जात आहे. पण आमचा न्यायालयावर, देशाच्या घटनेवर आणि तमाम जनतेवर विश्वास आहे, असेही या लेखात म्हटले आहे.

सत्तासंघर्षांवरून राज्याचे वातावरण तापलेले असताना सामनातून शिंदे गटाला “मिंधे गट” आणि भाजपला “कमळाबाई” असे म्हणत टीका करण्यात आली आहे. या सगळ्यावर शिंदे गट आणि भाजप काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
Ashish Shelar : सामनातील अग्रलेखावरून शेलारांचा ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले, मग घ्या ना
एक गट बारा भानगडींचा फुकट मॅटिनी शो बघायला काय हरकत आहे? सामनातुन शिवसेनेचा शिंदे गटाला टोला
Samna: मी सामना वाचत नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही, अमृता फडणवीसांची जहरी टीका
शिवसेनेकडून काँग्रेसची स्तुती पण थेट शरद पवारांवर निशाणा, सामनातील अग्रलेखाची राज्यभर चर्चा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now