Share

‘बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली’; राज ठाकरेंचा थेट आरोप

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि बहुसंख्य आमदारांसह भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आलं. त्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदार देखील शिंदे गटात प्रवेश करू लागले. त्यानंतर शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर नेत्यांवर निशाणा साधला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील शिंदे गटावर टीका करू लागले. राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले. त्यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीवर मोठे वक्तव्य केले.

म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रप्रेमापोटी शिवसेना फुटली. याला दुसरे कोणतेच कारण नव्हते. तुमची वागणूक, सगळ्या गोष्टी पैशात मोजायच्या, पैशात तोलायच्या. पक्षाकडे बघायचे नाही, लक्ष द्यायचे नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

आजही सगळे लोक काय सांगत आहेत?  लोक म्हणतात आज जे सुरू आहे त्यात उद्धव ठाकरेंना सहानुभुती मिळत आहे. मला हे कळालं नाही. यात सहानुभुतीचा काय संबंध?असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी एक उदाहरण देखील दिलं.

म्हणाले, लोकमान्य टिळकांनी किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराज, जोतिबा फुले यांनी त्यावेळी एक बँक काढली असती आणि ते गेल्यावर ती बॅंक डबघाईला आली असती तर त्या बँकेत तुम्ही पैसे टाकले असते का? ती बॅंक बाबासाहेबांनी, टिळकांनी काढली म्हणून तुम्ही पैसे टाकणार नाहीत.

पुढे म्हणाले, शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि तो पक्ष बाळासाहेबांसोबत गेला. आत्ताच्या शिवसेनेत बाळासाहेबांचा विचारही नाही. आजच्या पक्षप्रमुखांच्या अंगावर मराठी किंवा हिंदुत्वाच्या नावाने एक खटला तरी दाखल आहे का? त्या विषयावर मोर्चा काढला, आंदोलन केले असे काहीच नाही.

त्यांची इतकी भाषणे ऐकलीत तर बाळासाहेबांच्या तोंडातील दोन-चार वाक्य सोडली तर त्यांनी काय हिंदुत्व मांडलंय मला सांगावे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी २४ तास या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी बोलत होते. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील पाहावं लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now