Share

मंत्री झाल्यावर मतदारसंघात परतलेल्या भुमरेंच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली; वाचा नेमकं काय घडलं?

sandipan bhumre
तब्बल एक महिन्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अनेकांना डावलण्यात आले. सत्तेत असून देखील अनेकांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली.

शिंदे यांच्या बंडात सहभाग घेतला. प्रत्येक आमदाराची अपेक्षा होती की, नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं. मात्र तसं घडलं नाही. अनेकांच्या पदरी निराशा आली. तर दुसरीकडे ज्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले ते नेते आता राज्यात पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत.

शिंदे गटातील आमदार तथा राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे हे देखील मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात परतले. मात्र आपल्याच मतदारसंघात त्यांना एक विचित्र अनुभव आल्याच पाहायला मिळालं. भुमरेंच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली असल्याच पाहायला मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणमध्ये एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पैठणचे आमदार, मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी देखील आपली उपस्थिती होती. आता नवं-नवं मंत्रिपद मिळालेल्या आमदारांच्या कार्यक्रमाला तुफ्फान गर्दी होणं अपेक्षित होतं.

मात्र चित्र काहीस नकारात्मक पाहायला मिळालं. विशेष बाब म्हणजे, नवीनच मंत्रीपद मिळालेल्या भुमरे यांचा स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांच्यावतीने सत्कार सुद्धा ठेवण्यात आला होता. मात्र यावेळी चक्क शिवसैनिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कार्यक्रमाच्या ठिकाणी भुमरे यांचे मोजकेच समर्थक पाहायला मिळाले.

दरम्यान, तर मोठ्याप्रमाणावर खुर्च्या खाली असल्याचे सुद्धा दिसून आले. शिवसेना आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कार्यक्रमाचे फोटो ट्विट करून भुमरे यांना लक्ष केलं आहे. ‘सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी ‘देश भ्रमंती’ करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येई
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now