मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आता जुन्या शिवसैनिकांनी देखील राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवल्याचे वृत्त समोर आले आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केले आहे. जर हे भोंगे उतरवण्यात आले नाहीतर यासर्व मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेला शिवसेना आणि महाविकास आघाडीने विरोध दर्शविला आहे. यापूर्वी अशीच भूमिका हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती.
त्यामुळे काही जुन्या शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. आजही तळागाळातील काही शिवसैनिकांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी सहमती दाखवली आहे. याबाबत बोलताना, “आपण यासाठी असहमत कसे होऊ शकता? बाळासाहेब नेहमी याच मुद्यावर राहिले. राज यांच्याऐवजी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता,” असे मुंबईतील माजी शाखाप्रमुख म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी, राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला ९९ टक्के पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. यामुळे शिवसेनेतच आपसीवाद निर्माण होण्याची चिन्हे उपस्थित झाली आहेत. दरम्यान राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
या काळातच राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत बोलत असताना दिसून आले. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे ऐकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ऐकणार असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या
रावसाहेब दानवे म्हणाले ब्राम्हणाला मुख्यमंत्री बनवणार; अजितदादा म्हणाले तृतीयपंथी सुद्धा….
“बाबरी पाडताना देवेंद्र फडणवीस तेथे हजर होते, याला मी साक्षीदार आहे”
अवघ्या २२ व्या वर्षी हजारो कोटींची कंपनी उभी केली; पुण्याची आर्या तावरे झळकली फोर्ब्जच्या यादीत
पुण्याचा २२ वर्षीय आर्या तावरेचा डंका; फोर्ब्जच्या यादीत झळकले नाव; वाचा काय कामगिरी केलीय…