shinde group : शिंदे गटातून एक वेगळीच बातमी समोर येतं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे – फडणवीस सरकार जोमाने कामाला लागलं आहे. शिंदे गटातील नेत्यांनी आपापला मतदारसंघ पिंजून काढला आहे. असं असलं तरी देखील शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस काही केल्या थांबण्याच नाव घेतं नाहीये.
शिंदे गटातील नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले आहे. यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी सरकारला घरचा आहेर दिला असल्याचं बोलल जातं आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या याच निवेदनाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. चिंतेची बाब म्हणजे, सध्या तालुक्यात ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
याच पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिंदे गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. जळगाव , संग्रामपुर तालुका ओला दुष्काळ घोषित करा, इ. मागण्या घेऊन शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी पाटील यांना निवेदन दिलं आहे.
दरम्यान, शिंदे गटातील शिवसैनिकांनी दिलेल्या या निवेदनावर आता पाटील काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाटील आता यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या सत्तेत असून देखील शिंदे गटातील शिवसैनिकांनी दिलेल निवेदन चर्चेचा विषय बनला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…