Share

Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी

नुकत्याच १८जिल्ह्यातील १ हजार १६६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका पार पडल्या होत्या. त्याचा काल निवडणूक आयोगाकडून निकाल देखील जाहीर करण्यात आला. या निकालात राज्यातील काही बंडखोर नेत्यांना ठाकरेंनी त्यांच्याच होमपीचवर घेरलं असल्याचं समोर आलं आहे.

उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना त्यांच्याच गावात धडा शिकवत चांगलाच तडाखा दिला.  यात कोकणात अधिक वर्चस्व असलेले तीन नेते आहेत. यात आघाडीवर असणारा पहिला बंडखोर नेता म्हणजे मंत्री उदय सामंत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला झटका बसला आहे.

निवडणूक झालेल्या ३ ग्रामपंचायतींपैकी शिरगावमध्ये १७ जागा होत्या. यापैकी १४ जागांवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झाले. तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. अटीतटीच्या लढती काही ठिकाणी उमेदवारांनी निसटते विजय मिळवले.

रत्नागिरी जिल्ह्यातच उद्धव ठाकरेंकडून फटका बसलेला दुसरा नेता म्हणजे, आमदार योगेश कदम होय. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना त्याच्यांच होमपीचवर ठाकरेंसह महाविकास आघाडीने जबरदस्त तडाखा दिला. महाड तालुक्यात शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले आहेत.

दरम्यान, दुसरीकडे वाडा, भिवंडी, कल्याणमध्ये शिंदे गटाचा चांगलाच सुफडा साफ झाला. यामुळे शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांना जोरदार झटका बसला. ठाकरेंकडून दणका बसलेले ते चौथे आमदार ठरले. भिवंडीत ३१ पैकी १४ ठिकाणी ठाकरे गटाने वर्चस्व कायम ठेवलं.

भिवंडीत शिंदे गटाला घोडगाव येथील एकमेव जागेवर समाधान मानावं लागलं. शहापुरात ७९ पैकी ३० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्वावाद सत्ता स्थापन केली. तर एकूण ५१ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने सत्ता वर्चस्व मिळवले.

इकडे माणगाव तालुक्यातील पन्हाळगड ग्रामपंचायतीवर देखील शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कोणीही आले तरी आम्हीच जिंकणार असं कर्जतमधील शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे म्हणाले होते. त्यांच्या मोर्चेबांधणी नंतरही मतदारांनी त्यांचा चांगलाच धुव्वा उडवला. खालापूर तालुक्यातील चौक, लोधवलीसह चार ग्रामपंचायतींवर ठाकरेंचा विजय झाला.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now