shivsena : शिवसेनेच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावरून आता राजकारण तापलं आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे.
दसरा मेळाव्यावरील निकाल दिला आहे. शिवाजी पार्कमधील शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना परवानगी दिली आहे. यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली आहे. तर तिकडे ठाकरे गटात सध्या आनंदांचे वातावरण पसरले आहे. शिवसैनिकांकडून जल्लोष व्यक्त केला जातं असून ठिकठिकाणी पेढे वाटले जातं आहे.
अशातच आता शिवसेनेच्या वाघिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं आहे. ‘आपण चित्त्याचा फोटो काढण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. आता वाघाचा फोटो काढण्यासाठी मुंबईत शिवतीर्थावर या. तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये मावणार नाही, पण इतक्या जिगरबाज आणि निष्ठावंतांचा फोटो काढून जा, असे एका महिला शिवसैनिकाने म्हटले आहे.
याचबरोबर भाजपला लक्ष करताना युवा शिवसैनिकांनी म्हंटलं आहे की, ‘पंढरपुराची वारी तुम्ही केली, पण विठुराय आम्हाला पावला. शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची.’ न्यायालयाच्या निर्णयावरून आता राजकारण तापलं आहे. यानिमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते सोडले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या फोटोग्राफीच्या छंदामुळे नॅशनल पार्कमध्ये काही फोटोही काढले. ते फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले.
याचाच धागा पकडत आता शिवसेनेने मोदींना डिवचलं आहे. ‘आपण चित्त्याचा फोटो काढण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. आता वाघाचा फोटो काढण्यासाठी मुंबईत शिवतीर्थावर या,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Bank : बँकांची कामे आत्ताच करून घ्या; ऑक्टोबर महिन्यात बँकांना आहेत ‘या’ २१ सुट्ट्या