shingles skin disease | आजार असो वा कोणती दुसरी परंपरा भारतात त्याबद्दल अनेक गैरसमज असतात. काही आजारांबाबत जास्त गैरसमज असल्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे त्यांचे स्वास्थ अजून बिघडते. पण त्यावर वेळेत योग्य उपचार केले तर तो व्यक्ती पुर्णपणे बरा होऊ शकतो.
आज आम्ही तुम्हाला नागीण या आजाराबद्दल सांगणार आहोत, ज्याच्याबद्दल समाजात खुप गैरसमज आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना यावर वेळेत योग्य उपचार मिळत नाही. हा आजार झाला तर तुम्ही घरगुती उपचार करुनही हा आजार बरा करु शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला याबाद्दल काही माहिती देणार आहोत.
नागीण हा आजार होणे सामन्य गोष्ट आहे. कांजण्या, गोवर प्रमाणेच हा आजारही होतो. नागीण झाल्यावर आपल्या अंगावर एक पुरळ येते. त्याठिकाणी आपल्याला जळजळ वेदना होतात. ते पुरळ काही दिवसानंतर फुटतात. त्यानंतर तिथे खपली तयार होते आणि ती नागीण ठिक होते.
हा त्रास व्यक्तीला साधारण १ ते २ आठवडे सहन करावा लागतो. हे एक व्हायरल इन्फेक्शन असते. व्हायरस शरीरात गेल्यानंतर हा आजार होतो. हे दोन प्रकारचे व्हायरस असतात. पहिल्या व्हायरलचे नाव हरपीस सिम्पलेक्स व्हायरस आहे आणि दुसऱ्या व्हायरसचे नाव हरपीस जोस्टर व्हायरस असे आहे.
लहान मुलं किंवा इतरांना कोणाला ही नागीण झाली तर घरचे सदस्य अनेकदा घाबरुन जातात. त्यामुळे अनेकदा अंगारा लावणे, देवाला नवस अशा काही गोष्टी केल्या जातात, पण त्याचा रुग्णाला काहीही उपयोग होत नाही. आयुर्वेदाच्या अभ्यासानुसार शरीरात रक्त किंवा पित्त हे वाढले तर नागीण होते.
तसेच दुसरा एक गैरसमज म्हणजे नागीणची तोंड आणि शेपूट एकत्र झाली तर माणसाचा जीव जातो. पण असे होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा लोकांना नागीण होते. वृद्ध व्यक्ती, एचआयव्ही रुग्ण किंवा कर्करोगाचे रुग्ण यांना नागीण होण्याची शक्यता जास्त असते.
नागीण झाल्यावर वृद्ध किंवा मोठा आजार असलेल्या वक्तींनी लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. कारण लवकर उपचार घेतले नाही, तर नागीण ठिक तर होते. पण ज्याठिकाणी नागीण झाली आहे, त्याठिकाणी वेदना कायम राहते.ती वेदना वर्षभर सुद्धा राहते. तसेच नागीण डोळ्याजवळ नागीण झाली तर विशेष लक्ष द्यावे नाही, नाहीतर त्याचा दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यताही जास्त असते.
उपाय काय? – नागीण झाल्यावर तुम्ही लगचेच तुमच्या आयुर्वेदीक उपचारांना सुरुवात करु शकतात. रक्तमोक्षण आणि विरेचन ही आयुर्वेदीक औषधे आहे, जी तुम्ही नागीण झाल्यावर घेऊ शकतात. या औषधांमुळे नागीण फक्त ५ ते ६ दिवसांमध्ये नीट होऊन जाते.
तसेच नागीण या आजारावर तुम्ही घरगुती उपाच सुद्धा करु शकतात. दिवाळीत लागणारा जो गेरु असतो, तुम्ही त्याची २-३ चमचे पावडर घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला गाईचे तुप टाकावे लागेल. त्यानंतर ते पुरळ झालेल्या ठिकाणी लावावे लागेल. त्यावेळी तुम्हाला मात्र मांसाहार, तिखट पदार्थ आणि मसालेदार पदार्थ यांचा आहारातील समावेश टाळावा लागले.