Dussehra gathering : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र आज याबाबत उच्च न्यायालयाने सुनावणी घेत ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे शिंदे गटात काहीशी नाराजी पसरल्याचे दिसते. शिंदे गटाने परवानगी आपल्यालाच मिळावी, यासाठी पूर्ण तयारी करून सुद्धा फासा कुठे पलटला. हे तुम्हाला माहितीये का?
तर घडलं असं की, दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेची अनिल देसाई यांनी २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेकडे परवानगीचा अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटात गेलेल्या सदा सरवणकर यांनी सुद्धा दसरा मेळावा घेण्यासाठी शिवतीर्थ मिळावे, असा अर्ज केला. मात्र या अर्जावर निर्णय घेण्यास मुंबई महापालिकेने २२ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर असा तब्बल महिन्याभराचा विलंब केला.
नेमक्या याच मुद्द्याबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेच्या वतीने जोरदार युक्तिवाद करणाऱ्या वकील मिलिंद साठ्ये यांना विचारले. मात्र परवानगी अर्जावर निर्णय देण्यास मुंबई महापालिकेला एवढा उशीर का झाला? याबाबत वकील समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळेच उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला तुमचा निर्णयात चुकला असल्याचे स्पष्ट सांगितले.
तसेच शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आता २ ते ६ ऑक्टोबरपर्यंत शिवतीर्थाची जागा शिवसेनेला वापरण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सध्या मागील काही काळापासून फार बऱ्या नसणाऱ्या दिवसांमध्ये शिवसेनेला हा सुखद धक्का मिळाल्याचे म्हणायला हवे.
पोलिसांनी दादरमध्ये दोन्ही गटात आधीच तणाव असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो, असे सांगितले होते. हा मुद्दा सुद्धा महापालिकेच्या वकिलांनी मांडला. मात्र अधिक पोलीस ताफा तैनात करा, असे सांगत उच्च न्यायालयाने त्यांचा हा मुद्दाही खोडून काढला.
मुंबई महानगरपालिकेने अर्जावर वेळेत सुनावणी न करणे शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचे दिसते. याच मुद्द्याला हेरून उच्च न्यायालयाने मुंबई मनपाच्या निर्णयाला चुकीचे ठरवत उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली असल्याचे स्पष्ट होते.
महत्वाच्या बातम्या-
Ajit Pawar : मविआमध्ये मला गृहमंत्रीपद हवं होतं पण वरिष्ठांनी…; अजितदादांची खदखद अखेर बाहेर आलीच, म्हणाले..
Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याला परवानगी मिळताच उद्धवजींची पहिली प्रतिक्रिया; ‘विजयाच्या तयारीला लागा, कारण…
Nitesh Rane : ‘मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील, नाचे कुठले’; राणेंनी पातळी सोडली