shivsena : आज मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची मोठी उत्सुकता लागली आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि दुसरीकडे शिवसेना असे दोन दसरा मेळावे लोकांना पाहायला मिळणार आहेत. बीकेसीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.
यामध्ये दोन्हीही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडणार नाहीत. मात्र त्याआधी शिंदे गटातील खासदाराने मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ‘बीकेसीवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचे दोन खासदार आणि शिंदे गटात प्रवेश करणार आहे.’
कृपाल तुमाने हे नागपुरात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात मोहन भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी वृत्त माध्यमांशी बातचीत केली. तुमाने यांनी केलेल्या या विधानाबाबत शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे.
कृपाल तुमाने पुढे बोलताना असही म्हणाले, ‘मुंबई, मराठवाडा महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातील ते आमदार किंवा खासदार असू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बीकेसीवर होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्यात तुम्हाला दोन खासदार आणि पाच आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केलेला दिसेल.’
या आमदार, खासदारांना आमचे विचार पटत आहेत.’ त्यामुळेच ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तसेच पुढे बोलताना कृपाल तुमाने म्हणाले, ‘हिंदू लोकांचे रक्षण करणाऱ्या संघटनांच्या प्रमुखाचे विचार ऐकण्यासाठी मी अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमास येत असतो.’
या आधी मुंबईला शिवतीर्थावर बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी जायचो. मात्र त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बीकेसीवर मोठा दसरा मेळावा होणार आहे. यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा हिंदूबाबतचे विचार ऐकायला मिळतील. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. शिवसेनेला कायम शिव्या घालणाऱ्यांसोबत बसत नाही, असा टोलाही यावेळी खासदार तुमाने यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावला.
महत्वाच्या बातम्या-
Shinde group : शिंदे गटाच्या मेळाव्यात ‘या’ दिग्गज नेत्याची खुर्ची असणार रिकामी, चर्चांना उधाण
Shinde group : व्हॅनिटी व्हॅन, जेवणासाठी स्पेशल किचन, दसरा मेळाव्यानिमित्त शिंंदे गटाचा ‘शिंदेशाही थाट’
Shinde group : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये?