shinde group : सध्या शिवसेनेच्या गोटात अनेक घडामोडींना वेग आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने – सामने आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच शिंदे गटाने युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे.
शिंदे गटाने उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यभरात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कार्यकारणीत बहुतांश आमदार, मंत्र्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांचा युवासेनेत समावेश करून घेण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या चेहऱ्यांना शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर अधिक माहिती दिली आहे.
दरम्यान, आता आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणारे आता शिंदे गटात आल्याची माहिती देखील पावसकर यांनी दिली. याचबरोबर विविध विभागात वेगवेगळे तरुण काम करतील, असं देखील पावसकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. याचा ठाकरे गटावर देखील परिमाण होणार असल्याचं बोललं जातं आहे.
वाचा कोणा- कोणाची लागली वर्णी..?
अविष्कार भुसे, अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे पाटील, विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे, किरण साळी, सचिन बांगर, दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक, नितीन लांडगे, राहुल लोंढे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे, ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील.
महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे