निवडणूक आयोगाच्या निकालाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आयोगाने शिवसेनेचं चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिले आहे. अशात चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच हा झटका सुद्धा शिंदे गटाकडूनच मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे गट आता बीएमसीमधील शिवसेना कार्यालय आणि दक्षिण मुंबईतील शिवालय या पक्षाच्या कार्यालयांवर दावा ठोकण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार आधी बीएमसीमधील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतले जाणार आहे, त्यानंतर मुंबईतील शिवालय.
शिंदे गटाकडून लवकरच बीएमसीच्या आयुक्तांना पत्र पाठवण्यात येणार आहे.सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद होत आहे. त्यामुळे या दोन गटातील वादामुळे ते कार्यालय सध्या बंद करण्यात आलेले आहे. पण आता नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे आल्यामुळे ते दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.
तसेच कार्यालयासमोर कोणता राडा होऊ नये किंवा कोणता वाद होऊ नये यासाठी त्या कार्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्या कार्यालयांजवळ पोलिस तैनात करण्यात आलेले आहे. पोलिस असल्यामुळे आता तिथे कोणताही तणाव निर्माण होणार नाही आणि भांडणे होणार नाही.
शिवसेनेच्या या दोन कार्यालयांसोबत शिंदे गट आणखी काही कार्यालयांवर दावा करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या कार्यालयावर ते दावा करु शकतात. तसेच मुंबईतील २२७ शाखांवरही ते दावा ठोकू शकतात. नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर जे आवश्यक आहे ते ते ठाकरेंकडून घेतले जाईल, असे शिंदे गटातील नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शुक्रवारी निवडणूक आयोगाने याबाबत निकाल दिला होता. त्यानंतर सातत्याने ठाकरेंकडे असलेल्या कार्यालयांना शिंदे गट ताब्यात घेताना दिसून येत आहे. शिंदे गटाने नुकतेच शिवसेनेचे संसदेतील कार्यालय आणि महाराष्ट्र विधीमंडळ कार्यालय ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘महिना 4 लाख पगार, वर्क फ्रॉम होम’; तरी ‘या’ नोकरीसाठी कोणीच नाही तयार, काय आहे कारण? वाचा..
‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश, जिथे फक्त 27 लोक राहतात; जाणून घ्या त्या अनोख्या देशाबद्दल..
ठाकरेंच्या वकीलांच्या युक्तीवादामुळे घाम फुटला का? सरन्यायाधीश शिंदेंच्या वकीलांना स्पष्टच बोलले, म्हणाले..