shinde group : दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं बोललं जातं आहे. याचबरोबर लाखो शिवसैनिक या मेळाव्यांसाठी मुंबईत येणार असल्याचं बोललं जातं आहे.
यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट नियोजन करण्यात व्यस्त आहेत. दोन्हीही गटांकडून आपापले समर्थक मुंबई आणण्यासाठी प्रयत्न केले जातं आहे. आपल्या समर्थकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दोन्हीही गट चांगलेच तयारी करत आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्हीही गट पुन्हा आमनेसामने येणार आहेत.
तसेच शिवसेनेला म्हणजेच ठाकरे गटाला टक्कर देत शिंदे गट मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. तसेच शिंदे गटाकडून राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे.
यामुळे आता एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आले आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे, शिंदे गटाकडून तब्बल 1700 हून अधिक लालपरी बसेसचं बुकिंग करण्यात आले आहे. यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये रोख भरले असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते. यामुळे दसरा मेळाव्यामुळे एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आले असल्याचं बोललं जातं आहे. शिंदे गटाने नाशिकमधून बीकेसीच्या मैदानावरती ५० हजाराहून अधिक शिवसैनिक जाणार असल्याचा दावा केला आहे.
तर दुसरीकडे दसरा मेळाव्याकरिता वर्धा जिल्ह्यातूनही बसने शिंदे गटातील कार्यकर्ते रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्याच्या आठ तालुका मिळून एकूण 12 बस मुंबईला रवाना करण्यात आल्या आहे. यामुळे आता उद्या मुंबईतील वातावरण नेमकं कसं असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.