shinde group : आजचा दिवस ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्हीही गटांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. हे सांगण्याचं कारण म्हणजे, कोर्टाने अखेर दसरा मेळाव्यावरील निकाल दिला आहे. शिवाजी पार्कमधील शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना परवानगी दिली आहे.
यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली आहे. तर तिकडे ठाकरे गटात सध्या आनंदांचे वातावरण पसरले आहे. शिवसैनिकांकडून जल्लोष व्यक्त केला जातं असून ठिकठिकाणी पेढे वाटले जातं आहे. न्यायालयाच्या निर्णयावरून आता राजकारण तापलं आहे. शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.
बंदरे, मत्स्यविकास मंत्री दादा भुसे यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. माध्यमांशी बोलताना भुसे यांनी म्हंटलं आहे की, निकालासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयानुसार आम्ही मेळावा कुठे घ्यायचा हे निश्चित करु असं म्हटलं आहे.
पुढे बोलताना भुसे म्हणाल आहेत की, “न्यायालयाने असा निर्णय केला असेल तर आपण त्याच्या अंमलबजावणीचं काम करतो. तो तपासून पाहिला जाईल आणि त्यानुसार मार्गक्रमण करु,” तसेच “शिंदेसाहेब मेळावा कसा करायचा कुठे करायचा याबद्दल निर्णय घेतील तसा भव्य मेळावा होईल,” असं भुसे यांनी म्हंटलं आहे.
न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला असला तरी सध्या शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंबद्दल आनंदचं, उत्साहाचं वातावरण आहे. शिवाजी पार्क शिंदेंच्या मेळाव्याला कमी पडलं असतं. तसेच आता शिंदे मेळाव्यासाठी ज्या जागेची निवड करतील त्या ठिकाणी भव्यदिव्य दसरा मेळावा संप्पन होईल,” असं देखील भुसे म्हणाले.
दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात शिंदे गट लवकरच सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या सुनावणीबाबतची अंतिम कॉपी हातात पडल्यानंतर आज किंवा उद्या याबाबत निर्णय घेऊ, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आल्याचे समोर येते.
Bank : बँकांची कामे आत्ताच करून घ्या; ऑक्टोबर महिन्यात बँकांना आहेत ‘या’ २१ सुट्ट्या