Share

shinde group : शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर..! मंत्री आणि आमदारामध्येच जुंपली, मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी

Eknath Shinde

shinde group : एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी करत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केले आहे. तब्बल तीन महिन्यांचा कालावधी या नवीन सरकारने पूर्ण केला आहे. शिंदे – फडणवीस सरकारमधील नेते मंडळी सध्या चांगलेच राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहे.

असं असतानाच दुसरीकडे मात्र चित्र काहीस वेगळं पाहायला मिळत आहे. शिंदे – फडणवीस सरकारमधील नाराजी नाट्य अनेकदा चव्हाट्यावर येतं आहे. सरकारमधील मतभेद सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय बनला आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, पुन्हा एकदा शिंदे गटात खटके उडाले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, मंत्री आणि आमदाराधील हा वाद थेट मुख्यमंत्री शिंदेंपर्यत गेला असून मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याच देखील बोललं जातं आहे. मिळालेल्या महितीनुसार, शिंदे गटाचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांच्याच गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय?
अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली. यामुळे शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. पाटील यांनी मंजूरी दिल्यामुळे चिमणराव पाटील हे नाराज असल्याची माहिती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, ‘राष्ट्रवादीचा आमदारच काय, पण कम्युनिस्ट पक्षाचा माणूस जरी माझ्याकडे आला तरीही मी त्याच्यासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. आता यावरूनच शिंदे गटात नवीन वादाला तोंड फुटले आहे.

गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना चिमणराव पाटील यांनी म्हंटलं आहे की, ‘एक – एक मतांनी सरकार बनत असतं, सरकार आहे म्हणूनच तुम्ही आज मंत्री आहात. माझ्यावर अन्याय झाला हे मान्य करतो. याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी फोन करून यापुढे असं व्हायला नको, असं सांगितलं असल्याचंही देखील आमदार चिमणराव पाटील यांनी यावेळी सांगितलं. .

महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now